दादर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार!

88

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८०व्या जन्मोत्सवानिमित्त दादर, मुंबई येथे २१ मे २०२२ रोजी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानिमित्ताने हिंदु राष्ट्र स्थापनेचा हुंकार दिसला. या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील १ हजार ५०० हून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते.

कोण कोणत्या संघटना सहभागी झाल्या?

या हिंदू एकता दिंडीत शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते, भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर, सनातन संस्थेच्या सद्गुरू (सुश्री) अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेच्या संत पू.(सौ.) संगीता जाधव, वसई (मेधे) येथील श्री परशुराम आश्रमाचे संचालक भार्गवश्री बी.पी.सचिनवाला, गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण कानविंदे आदी मान्यवरांची वंदनीय उपस्थिती लाभली. हिंदु राष्ट्र सेना, राष्ट्रीय बजरंग दल, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, हिंदू गोवंश रक्षा समिती, हिंदू हेल्पलाईन, भारत स्वाभिमान, भगवा गार्ड, स्वतंत्र सवर्ण सेना, अखिल भारतीय ब्राह्मण विकास परिषद, अखिल भारत हिंदु महासभा, हिंदू टास्क फोर्स, हिंदु विधीज्ञ परिषद, हिंदु जनजागृती समिती, हिंद सायकल आणि शिवडी मार्केट गणेशोत्सव मंडळ आदी हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक संघटना आणि मंडळे तसेच योग वेदांत सेवा समिती, गायत्री परिवार, वारकरी संप्रदाय, पतंजली योग समिती, श्री राज मरूधर जैन संघ (दादर), वामनराव पै संप्रदाय, माँ शक्ती सामाजिक संस्था आदी संप्रदायांच्या प्रतिनिधींसह हिंदूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

dindi2

(हेही वाचा शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी छत्रपती संभाजी राजेंना शिवसैनिकच व्हावे लागणार; शिवसेना भूमिकेवर ठाम)

काय स्वरूप होते दिंडीचे?

दादर (प.) येथील कबूतरखानाजवळील ब्राह्मण सेवा मंडळ चौक येथून आरंभ झालेल्या या हिंदू एकता दिंडीचा आरंभ शंखनाद आणि धर्मध्वजाच्या पूजनाने झाला. या दिंडीतील श्री मुंबादेवी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीचे भाविकांनी भावपूर्ण दर्शन घेतले. दिंडीच्या मार्गात ठिकठिकाणी सुवासिनी महिलांनी देवीचे औक्षणही केले. पारंपरिक वेश परिधान करून, भगवे झेंडे हातात धरून घोषणा देत या दिंडीमध्ये हिंदू बांधव सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या फेरीत सहभागी झालेल्या प्रशिक्षित युवक-युवकांनी लाठीकाठी, दंडसाखळी यांसह दाखविलेली स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या फेरीत हिंदु जनजागृती समितीचे, रणरागिणी पथक, प्रथमोपचार पथकासह डॉक्टरांचे पथक आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांच्या पथकानेही सहभाग घेतला. टाळ, मृदुंगाचा ठेका धरत भजने म्हणत वारकरी पथकही या दिंडीत सहभागी झाले होते तर नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनींनी डोक्यावर कलश घेऊन आणि लेझीम पथकात सहभाग घेतला. योग वेदांत समितीच्या पथकाने स्वदेशी उत्पादने वापरण्याचे आवाहन या फेरीत केले. सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शनाचे पथक तसेच हिंदु राजे आणि क्रांतीकारक यांच्या वेशभूषेत असलेल्या सनातनच्या बालसाधकांचे पथक आणि संगीत, नृत्यकला आदी विविध कलांतून साधनेचा दृष्टीकोन देणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी आदी सर्व उत्साहाने फेरीत सहभाग झाले. ‘हिंदू एकता दिंडी’ची सांगता शिवाजी पार्कजवळील चौकात झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.