गेल्या काही काळापासून हिंदु व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुस्लिम देशांच्या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्पादनेही ‘हलाल सर्टिफाइड’ होऊ लागली आहेत. मुळात भारत सरकारच्या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची गरजच काय ? असा सवाल हिंदू जनजागृती समितीकडून केला जात आहे.
( हेही वाचा : Halal Product:” हलाल मुक्त दिवाळी अभियान” आहे तरी काय? )
ट्विटरवर ट्रेंड होतंय ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियान
मॅकडोनल्ड्स, केएफ्सी, बर्गरकिंग, पिझ्झा हट यांसारख्या नामवंत कंपन्या त्यांच्या आऊटलेटमध्ये हलाल नसलेले खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याने हिंदू, जैन, शीख अशा गैर-मुस्लिम समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ सक्तीने विकले जात आहेत. भारतातील 15 टक्के मुसलमान समाजासाठी 85 टक्के हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती का याविरोधात आता ट्विटरवर बॉयकॉट हलाल प्रोडक्ट्स, हलालमुक्त दिवाळी असे ट्रेंड सध्या सुरू आहेत. हलाल सक्तीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यंदाच्या दिवाळीत ‘हलाल मुक्त दिवाळी’ हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असून त्यांच्यावतीने मॅकडोनल्ड्स, केएफ्सी, बर्गरकिंग, पिझ्झा हट दुकानांबाहेर आंदोलनही करण्यात आले.
Because of 15% why 85% should also consume Halal products..??#Halal_Free_Diwali pic.twitter.com/Ume22OruLt
— Samarth AC (@AcSamarth) October 17, 2022
India’s first Halal cruise commenced on 14 th August 2022. All McDonald restaurants in India are Halal certified. Despite most of their consumers being Hindus, McDonald forces them to eat Halal.#Halal_Free_Diwali हलाल मुक्त दीपावली pic.twitter.com/CZsuuSi1bx
— Ganesh Pansare (@GA_Pansare) October 17, 2022
हिंदु जनजागृती समितीचे आवाहन
हिंदूंना इस्लामी मान्यतेनुसार बनवण्यात आलेले ‘हलाल’ पदार्थ देणे, हा हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अनादर आहे. भारतातील हिंदूंना खाण्याचे किंवा खरेदीचे संवैधानिक स्वातंत्र्य का नाही ? कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदु समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती खपवून घेणार नाही. याबरोबरच हिमालया, नेस्ले यांसारख्या अनेक कंपन्यांचे शाकाहारी पदार्थ देखील ‘हलाल सर्टिफाइड’ करून विकत आहेत. त्यामुळे हिंदु समाजाने ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने न घेता यंदाची मंगलमय दिवाळी ही हिंदु पद्धतीने ‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community