धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधात राज्यात कायदा लागू करावा या मागण्यांनी गेल्या महिन्यांपासून जोर धरला आहे. यासाठी राज्यातील विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. रविवारी सकाळपासून पुण्यात सर्वात मोठ्या हिंदु जनआक्रोश मोर्चाला सुरूवात झालेली आहे.
( हेही वाचा : सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीसोबत राऊत भारत जोडोमध्ये, दीपक केसरकरांची टीका )
धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद यासाठी कडक कायदे करावेत आणि या कायद्यांची कठोर अंमलबजावणी राज्यात करावी तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात सहभागी हिंदू बांधवांनी भगवे झेंडे, भगव्या टोप्या परिधान केल्या असून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामागे धर्मवीर लिहिले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन ‘धर्मवीर’ दिन घोषित करावा, लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याच्या या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.
यापुढे हिंदू समाज अन्याय सहन करणार नाही
या मोर्चाचे नाव जरी हिंदू जनआक्रोश मोर्चा असे असले तरी ही हिंदू गर्जना आहे. आज हिंदू समाज एकटवला आहे, ज्या पद्धतीने समाजात लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत, हिंदू मुलींवर अत्याचार केले जात आहेत या विरोधातील हा संघर्ष आहे. ख्रिस्ती मिशनरी किंवा अरबच्या पैशांवर जे धर्मांतर केले जात आहे, त्या विरोधातील हा संघर्ष आहे. या पुढील काळात अशा गोष्टी हिंदू समाज सहन करणार नाही अशा प्रतिक्रिया प्रसारमाध्यामांना मोर्चात सहभागी झालेल्या हिंदू बांधवांनी दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community