हलालच्या विरोधातील आंदोलन आता महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांतही जोर धरू लागले आहे. कर्नाटकातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी हातात आंदोलनाचा झेंडा हाती घेवून इस्लामी अर्थव्यवस्थेच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.
धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांची चौकशी करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार मंजुनाथ जानकी यांनी निवेदन स्वीकारले.
(हेही वाचा हिंदूंच्या धर्मांतरासाठी ॲमेझॉन पुरवते पैसा? राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची नोटीस)
या आंदोलनात ‘हमारा देश संघटने’चे व्यंकटेश शिंदे, श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकीतकर, हिंदुत्वनिष्ठ मारुति सुतार, सदानंद मासेकर, संजय राजपूत, रविकुमार करलिंगनावर, विक्रम लाड, पारितोष पोद्दार, अक्काताई सुतार, मीलन पवार, हिंदु जनजागृती समितीचे हृषिकेश गुर्जर यांच्यासह विविध संघटनांचे ३० हून अधिक प्रतिनिधी-कार्यकर्ते उपस्थित होते.
(हेही वाचा हलाल विरोधी मोहिमेचा यशस्वी परिणाम, डोंबिवलीत कोकण महोत्सवातून हलाल स्टॉल फलक हटवला )
Join Our WhatsApp Community