हिंदू महासभा, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने १ ऑगस्ट २०२२ या दिवशी सातारा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आदरांजली सभा आणि प्रदेश कार्यकारिणीची सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष गोविंदराव तिवारी आणि सर्व हिंदु महासभेचे कार्यकर्ते यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी लोकमान्य टिळकांच्या महान कार्याविषयी माहिती देत सभेला संबोधित केले. या ठिकाणी हिंदू महासभेच्या वरिष्ठ नेत्यांचा आणि वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या सभेला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि हिंदु महासभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
(हेही वाचा धार्मिक पक्षपात करणाऱ्या MPCB च्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, हिंदु जनजागृती समितीची मागणी)