मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसह संपूर्ण भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने मागील 20 वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला 26 सप्टेंबर 2022 या दिवशी अर्थात् घटस्थापनेच्या दिनी 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विदशक-पूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने व्यापकस्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह संपूर्ण भारतभर 31 ऑगस्टपासून चालू झालेले हे अभियान नोव्हेंबर महिन्यापर्यंत राबवले जाईल, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल आणि वसई (मेधे) येथील श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गव बी.पी. सचिनवाला हे उपस्थित होते.

( हेही वाचा : आयुक्त चहल आणि अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांची महापालिकेतील खुंटी मजबूत)

हिंदु राष्ट्र संकल्प अभियानातील विविध उपक्रम !

‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’त ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘हिंदु धर्माची महानता’, ‘शौर्य जागरणाची आवश्यकता’, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’ इत्यादी विषयांवरील व्याख्याने, हिंदु राष्ट्र जागृती करणारी फलकप्रसिद्धी करणे, मंदिरे, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, महिला संघटनाचे उपक्रम, स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याशिवाय नुकताच पनवेल येथे हिंदूसंघटन मेळावा घेण्यात आला. ‘हिंदु राष्ट्र परिसंवाद’, हिंदुत्वनिष्ठ संघटना, अधिवक्ता यांच्या बैठकाही आदी उपक्रम देशभरात राबवले जाणार आहेत, अशी माहिती रमेश शिंदे यांनी दिली.

‘या उपक्रमांतून हिंदु समाजमनात हिंदु राष्ट्राचा संकल्प दृढ व्हावा आणि हिंदु समाजाने हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील व्हावे, या दृष्टीने उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. हे अभियान चालू झाल्यापासून विविध संघटना, संप्रदाय यांना सोबत घेऊन आयोजित केलेल्या समितीच्या विविध उपक्रमांना समाजातून आतापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे,’ असे भार्गव बी.पी. सचिनवाला या वेळी म्हणाले.

‘मागील 20 वर्षे सातत्याने केलेल्या जागृतीमुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन रोखण्यासाठी राज्यातच नव्हे, तर भारतभरात हिंदू कृतीशील झालेला दिसत आहे. धर्मशिक्षण, धर्मजागृती, हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण या पंचसूत्रीच्या आधारे समितीकडून वर्षभर विविध उपक्रम देशभर राबवले जातात. हे सर्व कार्य ईश्वरी कृपा, संतांचे आशीर्वाद आणि हिंदुत्वनिष्ठांचा कृतीशील सहभाग यांमुळे होत आहे’, अशी कृतज्ञतापर भावना यावेळी ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here