लँड जिहादविरुध्द हिंदू समाज आक्रमक! धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

132

धुळे शहरातील ऐंशी फुटी रोड, कृषी उत्पन्नबाजार समिती मागील परिसर, नटराज टॉकीज जवळील भागात राहणाऱ्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी लँड जिहादविरुध्द जोरदार आंदोलन करीत हिंदू रहिवाशांना दिला जात असलेल्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. यात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी सामील झाले होते. याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले.

( हेही वाचा : हैदराबादमध्ये ‘मॉडेल कॉरिडोर’! सायकल ट्रॅक पादचारी मार्गासह, वीजनिर्मितीसाठी सौर छताची सुविधा)

शहरातील मनमाड जीन, बडगुजर प्लॉट, जलाराम बाप्पा मंदिर परिसर, हमाल मापाडी प्लॉट, नाटेश्वर कॉलनी, भगा मोहन नगर, राजेंद्रसूरी नगर, अलंकार सोसायटी, विश्वकर्मा नगर, माणिक नगर, शांतीनगर, साईप्रसाद कॉलनी, शिव कॉलनी, श्री रामनगर, रामचंद्र नगर, लक्ष्मी नगर, स्वामीनारायण कॉलनी, पवन नगर तसेचसंपूर्ण चंद्रशेखर आझाद नगर परिसरातील रहिवाशांना ठरवून टार्गेट करण्याचा प्रकार काही समाजकंटक धर्मांध करीत आहेत. हिंदूंमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणोकरून या भागातील हिंदू या सर्व गोष्टींना कंटाळून आपले बहुमूल्य घर कवडीमोड भावात विकतील. असा हा लँड जिहादचा प्रकार असून रहिवाशांना त्वरीत सुरक्षा पुरवणे आवश्यक आहे. येथे नटराज टॉकीज शेजारील प्रशासनाच्या हॉस्पिटल तथा प्रस्तुतीगृहसाठी आरक्षित जागेवर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता जवळपास २० हजार स्क्वेअर फुट जागेवर वॉल कंपाऊंड टाकण्यात आले आहे. या भागात प्रवेश करण्यासाठी एकमेव असलेला रस्ता म्हणजे नटराज टॉकीज शेजारील रस्ता तिथे मोठ्या घोळख्याने उभे राहून टवाळक्या करणे, येणाऱ्या-जाणाऱ्या माता-बहिणींची छेड काढणे, विनाकारण कुणाशीही हुज्जत घालणे तसेच परिसरात ‘ओसामा का जन्म दिन, शाहरुख का जन्म’ असे मोठमोठे होर्डिंग लावण्यात येतात. हिंदू बहुल भागात जाणून-बुजून ट्रीपल सीट मोटरसायकलवर जोरात येणे जाणे, हॉर्न वाजवणे, कोणाला धक्का लागल्यास अरेरावी करून शिवीगाळ करण्यात येते. तसेच गाईंची चोरी, दिवसाढवळ्या घरात घुसून मोबाईल चोरी असे प्रकार करून एकप्रकारे समस्त हिंदू समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी या लँड जिहादचा वेळीच बंदोबस्त करावा, शासकीय जागेवरील अतिक्रमण काढावे, समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.