खलिस्तानी (Khalistani) समर्थकांनी पुन्हा एकदा अमेरिकेतील हिंदू मंदिरावर हल्ला केला आहे. कॅलिफोर्नियातील नेवार्क येथील हिंदू मंदिराच्या बाहेरील भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिल्या गेल्या आहेत.अशी बातमी एका वृत्तसंस्थेने दिली आहे. नेवार्क पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. (Hindu temple vandalised in the US)
मात्र, परदेशात हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला होता. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने सांगितले की नेवार्क, कॅलिफोर्निया येथील स्वामीनारायण मंदिर वासन संस्थेची खलिस्तान समर्थकांनी विटंबना केली आहे. याबाबत आपण सखोल चौकशी करू असे आश्वासन नेवार्क पोलिसांनी दिले आहे. (Hindu temple vandalised in the US)
(हेही वाचा : Swami Shraddhanand : हिंदूंच्या शुद्धीकरणाची चळवळ तळमळीने राबवणारे स्वामी श्रद्धानंद)
A Hindu temple has been vandalised with anti-India and pro-Khalistan graffiti on its exterior walls in Newark, California, United States. Newark Police has assured a thorough investigation into the incident. pic.twitter.com/ruhEY6nkv1
— ANI (@ANI) December 23, 2023
ऑस्ट्रेलियामध्ये अशा घटना अनेकदा घडल्या आहेत.
यापूर्वीही ऑस्ट्रेलियामध्ये अशाच घटना घडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी खलिस्तानींनी एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले होते. त्यांनी श्री लक्ष्मी नारायण मंदिरावर हल्ला केला होता. या घटनेत मंदिराच्या भिंतीचे नुकसान झाले.
मेलबर्नमधील तीन हिंदू मंदिरांना केले होते लक्ष्य
जानेवारीत मेलबर्नमधील तीन हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले होते. यादरम्यान खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी केली. महत्त्वाचे म्हणजे, मंदिरांवरील हल्ल्याचा भारताने निषेध केला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारला या प्रकरणात त्वरित कारवाई करण्यास सांगण्यात आले होते.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community