-
ऋजुता लुकतुके
ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीत आघाडीवर असलेली देशातील कंपनी आहे हिंदुस्तान युनिलिव्हर. या कंपनीची मालकी नेमकी कुणाकडे आहे तुम्हाला ठाऊक आहे का? अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात १८८९ च्या दशकात कंपनीने आपलं पहिलं उत्पादन भारतात आणलं होतं. ‘लाईफबॉय’ हा साबण आणि त्याची जाहिरात त्या काळात चांगलीच गाजली होती. तिथपासून ते भारतातील हिंदुस्तान वनस्पती लिमिटेड या कंपनीशी लिव्हर कंपनीचा झालेला भागिदारी करार असा मोठा इतिहास या कंपनीला लाभला आहे. (Hindustan Unilever Owner)
(हेही वाचा- Kolkata Rape Case: १७ ऑगस्ट रोजी दवाखाने बंद राहणार, IMAची देशव्यापी बंदची हाक)
लिव्हर ब्रदर्स इंडिया लिमिटेड आणि हिंदुस्तान वनस्पती मॅनुफॅक्चरिंग लिमिटेड या दोन कंपन्यांच्या संगमाने हिंदुस्तान युनिलिव्हर ही कंपनी स्थापन झाली आहे. १९५६ मध्ये ही कंपनी भारतात अस्तित्वात आली. आणि त्याची मालकी प्रामुख्याने इंग्लंडमधील लिव्हर बंधूंकडेच आहे. कंपनीचं मुख्यालय मात्र मुंबईत आहे. आणि भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे. (Hindustan Unilever Owner)
कंपनीचं संचालक मंडळ मोठं असून त्यावर सध्या १७ संचालक आहेत. कंपनीचे २१,००० कर्मचारी देशभर काम करतात. हिंदुस्तान युनिलिव्हरची उत्पादनं १९० देशांमध्ये जातात. तर कंपनीचं शेअर बाजारातील भागभांडवल जवळ जवळ ६ ट्रिलियन रुपये इतकं आहे. कंपनीची महत्त्वाची उत्पादनं आणि ती कधी सुरू झाली ते पाहूया, (Hindustan Unilever Owner)
(हेही वाचा- ISRO: आता भारताला ऐकू येणार पृथ्वीच्या हृदयाचे ठोके, इस्रो काय सरप्राईज देणार?)
लाईफबॉय साबण, पिअर्स साबण, ब्रूक बाँड हा चहाचा ब्रँड, व्हिम हा कपड्यांचा साबण, वनस्पती तूपाचा ब्रँड, पाँड्सची उत्पादनं, सर्फ साबण, रिन बार, ब्रू कॉफी, लिरिल साबण, क्लोज – अप टूथपेस्ट, फेअर अँड लव्हली, लिप्टन ताझा चहा, लॅक्मेची सर्व उत्पादनं, क्वालिटी वॉल्श आईस-क्रीम, वीवॉश ही कंपनीची प्रमुख उत्पादनं आहेत. २०२३ पासून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालन रोहीत जावा आहेत. (Hindustan Unilever Owner)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community