‘हिंदुस्थान पोस्ट’चा दिवाळी अंक आला; Raj Thackeray यांच्या हस्ते प्रकाशन

718

‘हिंदुस्थान पोस्ट’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन २७ ऑक्टोबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदुस्थान पोस्टच्या दिवाळी अंकाचे हे प्रथम वर्ष असून राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. ‘हिंदुस्थान पोस्ट’चा हा दिवाळी अंक ‘डावा दहशतवाद डीप स्टेट’ या विषयाला वाहिलेला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी दिवाळी अंकाच्या निर्मिती करणाऱ्या ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, मार्गदर्शकांचे, लेखकांचे कौतुक केले. तसेच दिवाळी अंक महाराष्ट्राची परंपरा असल्याचे उद्गार काढले. (hindusthan post diwali ank 2024)

raj1

‘हिंदुस्थान पोस्ट’च्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य संतोष कारकर, श्वेता परुळकर, विवेक परुळकर आणि लेखक जयेश मेस्त्री, हिंदुस्थान पोस्टचे वृत्त संपादक सुनील पाटोळे, राजकीय संपादक सुजित महामुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. (hindusthan post diwali ank 2024)

काय आहे दिवाळी अंकाचे वैशिष्ट्ये? 

या दिवाळी (hindusthan post diwali ank 2024) अंकात भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्य सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारे यांनी ‘डीप स्टेट’चा चेहरा उघडा पाडत त्यावर उपाययोजना सुचवल्या आहेत. ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी ‘हिंदू संविधान बदलणार’ या नॅरेटिव्हच्या चिंधड्या उडवत संविधानाचे खरे शत्रू लोकांसमोर आणले आहेत. स्वातंत्र्यवीरांचे नातू रणजित सावरकर यांचा ओम सर्टिफिकेटविषयीचा हिंदूंना मार्गदर्शन करणारा लेख या अंकात आहे. त्यांनी ओम सर्टिफिकेटच्या माध्यमातून  हलाल, थूक जिहाद, फूड जिहाद या हिंदूंविरोधी जिहादी कृत्यांविरोधात मोठी चळवळ उभारली आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांनी या अंकात आंदोलजीवींचा बुरखा फाडला आहे. लव्ह जिहाद, वोकिझम, सांस्कृतिक दहशतवाद, डीप स्टेटचे षडयंत्र, टूल किट, जंगली आणि शहरी नक्षलवाद अशा सर्व तुकडे तुकडे गँगची पोलखोल या अंकात करण्यात आली आहे.(hindusthan post diwali ank 2024)

WhatsApp Image 2024 10 27 at 10.05.04 PM

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा उपक्रम असलेल्या ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या या दिवाळी अंकाचे अतिथि संपादक स्मारकाचे अध्यक्ष आणि निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित हे आहेत. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर हे अंकाचे प्रकाशक असून सहकार्यवाह स्वप्नील सावरकर हे संपादक आहेत. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे वृत्त संपादक सुनील पाटोळे आणि लेखक जयेश मेस्त्री यांनी या अंकाचे संपादन केले आहे. मुखपृष्ठ आणि रेखाटने प्रदीप म्हापसेकर यांची असून स्वानंद गांगल यांनी व्यंगचित्रे काढली आहेत. सुरज काटे यांनी अंकाची मांडणी केली असून त्याला प्रथमेश भोईर यांनी सहाय्य केले आहे. या अंकासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सदस्य  श्वेता परुळकर, विवेक परुळकर यांचे विशेष सहाय्य लाभले आहे.

आपल्याला हा दिवाळी अंक हवा असल्यास 9220070386 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

हेही पाहा :

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.