RC Majumdar : इतिहासकार आर सी मजुमदार

648
RC Majumdar : इतिहासकार आर सी मजुमदार

रमेशचंद्र मजुमदार हे भारतातील प्रसिद्ध इतिहासकार होते. ‘आर सी मजुमदार’ (RC Majumdar) या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी प्राचीन भारताच्या इतिहासावर खूप मोठे काम करुन ठेवले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासावरही त्यांनी बरेच लिखाण केले आहे. भारतीय इतिहासात त्यांनी दिलेल्या असाधारण योगदानामुळे त्यांना इतिहासाचे प्रणेते मानले जाते.

जदुनाथ सरकार यांच्या प्रेरणेने मजुमदार (RC Majumdar) यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात प्राचीन भारताच्या अभ्यासातून केली. पुढील पाच दशकांत त्यांनी बंगालच्या प्रादेशिक इतिहासावर, भारतीय सांस्कृतिक प्रभावावर, प्राचीन हिंदू वसाहतवादी आणि आधुनिक भारतीय इतिहासावर व्यापक संशोधन केले. याचा लाभ आजच्या अभ्यासकांना होत आहे.

(हेही वाचा – Alandi : देवस्थानच्या विश्वस्त पदावरून स्थानिकांना डावल्याने आळंदी बंद)

आर सी मजुमदार (RC Majumdar) यांचा जन्म ४ डिसेंबर १८८८ रोजी खंडारपारा जिल्ह्यातील फरीदपूर येथे झाला. १९१४ मध्ये ते कलकत्ता विद्यालयाचे प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती विभागात लेक्चरर म्हणून रुजू झाले. १९२१ मध्ये त्यांची ढाका विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. १९३६ ते १९४२ पर्यंत ते या विद्यापीठाचे कुलगुरू होते.

१९५० मध्ये ते काशी हिंदू विद्यापीठाच्या भारतविद्या महाविद्यालयाचे रेक्टर झाले. त्यांनी (RC Majumdar) शिकागो विद्यापीठातही अध्यापन केले. युनेस्कोच्या मानव इतिहास आयोगाचे ते उपाध्यक्ष होते. History & culture of the Indian People लिहून त्यांनी खूप मोठे काम केले. त्यांनी भारतीय इतिहासाची तीन कालखंडात विभागणी केली आहे. इसवी सन १००० पर्यंतचा प्राचीन काळ, इसवी सन १००० ते १८१८ पर्यंतचा मध्य काळ आणि १८१८ नंतरचा आधुनिक काळ.

(हेही वाचा – IND vs AUS 5th T20 : भारताने ४ – १ ने मालिका जिंकली)

त्यांच्या (RC Majumdar) ऐतिहासिक लेखनामुळे इतिहासाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन प्राप्त झाला. त्याचबरोबर ते “हिस्ट्री ऍंड कल्चर ऑफ इंडियन पीपुल”चे महासंपादक देखील होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.