पुण्यातील गणेश मंडळांचे ऐतिहासिक पाऊल! सात मंडळांचे बाप्पा एकाच रथात विराजमान होणार

पुण्यातील धनकवडी येथील सात मंडळांनी ऐतिहासिक पाऊल उचलले असून, गणेश चतुर्थीच्या दिवशी सातही मंडळांचे बाप्पा एकाच रथात बसवून त्यांची पहिल्या दिवशीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे खर्चही मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. या वाचलेल्या पैशातून आम्ही गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम राबवणार आहोत, असेही धनकवडी मंडळातील कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

सात मंडळांचे बाप्पा एकाच रथात विराजमान होणार

धनकवडी भागातील केशव कॉम्प्लेक्स मित्रमंडळ, जय महाराष्ट्र मित्रमंडळ, अखिल नरवीर तानाजीनगर मित्रमंडळ, पंचरत्नेश्वर मित्र मंडळ, एकता मित्रमंडळ, अखिल मोहननगर मित्रमंडळ ट्रस्ट, विद्यानगरी मित्रमंडळ या मंडळांनी हा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवशी हजारो गणेशभक्त पारंपरिक वेशभूषेत या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच ढोल वादनाबरोबरच मिरवणुकीला सुरूवात होणार असल्याचे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी मोडी प्रशिक्षण सुरू )

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला. यंदा कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र दिसू लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याची परवानगी दिली. त्यामुळे मंडळे तयारीला लागली आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here