गोवा नाव उच्चारताच डोळ्याला सुखावणारा हिरवागार निसर्ग, पसरलेला अथांग समुद्र, माडांचे बन, वळणावळणाचे रस्ते, अतरंगी रंगाची कौलारू घरं अशा कित्येकशा गोष्टींचा कोलाज मनात तयार होतो. गोव्याचं आकर्षण अनेकांना वाटतं त्याला प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत. इथला शांतनिवांतपणा अनेकांना सुखावतो. धकाधकीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून समुद्रकिनारी पहुडायला अनेकांना आवडतं. पण असा हा निसर्गरम्य गोवा भारताचा भाग कधी झाला माहिती आहे का? भारत देश 1947 ला स्वातंत्र झाला. पण गोव्याला स्वातंत्र्य मिळाले नाही. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. 30 मे 1987 ला गोव्याची स्थापना करण्यात आली. गोवा पोर्तुगालांकडून भारतीय सैन्याने कसा मिळवला त्याचा रोचक इतिहास पाहूया.
राम मनोहर लोहिया यांचे मोठे योगदान
स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीजांनी गोवा भारताकडे सोपवावा अशी विनंती करण्यात आली होती, पण पोर्तुगीजांनी ती फेटाळून लावली. गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आता भारताकडे एकच मार्ग शिल्लक होता तो म्हणजे युद्ध. गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे मोठे योगदान आहे. 1946 मध्ये ते गोव्यात गेले, तिथे पोर्तुगीज इंग्रजांपेक्षाही अधिक जुलूम करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी गोव्यात स्वातंत्र्यलढ्याची मोहीम उभारली. लोहिया यांना पोर्तुगीजांनी तुरुंगात डांबले. त्यानंतरही गोव्याचा स्वातंत्रलढा सुरूच राहिला.
भारतीय सैन्य गोव्यात शिरले
1961 मध्ये भारत सरकारने गोवा ताब्यात घेण्याचे ठरवले आणि 17 डिसेंबरला 30 हजार भारतीय सैनिक पोर्तुगिजांच्या तावडीतून गोव्याला मुक्त करण्यासाठी पाठवण्यात आले. या ऑपेरेशनला ‘ऑपेरेशन विजय’ असे नाव देण्यात आले. या ऑपेरेशनमध्ये नौदल आणि हवाई दल यांचीही मदत घेण्यात आली.
गोवा भारताचा अविभाज्य भाग बनला
भारतीय सैन्याची ताकद पाहून पोर्तुगालने 36 तासांच्या आत गुडघे टेकले आणि गोवा सोडण्याचा निर्णय घेतला. 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीज जनरल मॅन्युअल अँटोनीओ वासोलो ए सिल्व्हा यांनी आत्मसमर्पण करण्याच्या दस्तावेजावर सही केली. अशा प्रकारे गोवा 450 वर्षांनंतर पोर्तुगीजांकडून स्वतंत्र झाला.
Join Our WhatsApp Community