Gateway of India : मुंबईची शान असलेल्या ‘गेटवे ऑफ इंडिया’ची शताब्दी

47
Gateway of India : मुंबईची शान असलेल्या 'गेटवे ऑफ इंडिया'ची शताब्दी
Gateway of India : मुंबईची शान असलेल्या 'गेटवे ऑफ इंडिया'ची शताब्दी
उज्ज्वला गोविंदराव आगासकर

महानगरी मुंबईमधील (Mumbai) ज्या देखण्या आणि ख्यातनाम वास्तू आहेत, त्यांपैकी एक विशेष वास्तू म्हणजे ‘गेटवे ऑफ इंडिया’ ! ४ डिसेंबर या दिवशी ‘गेटवे ऑफ इंडिया’चे (Gateway of India) दिमाखात उद्घाटन करण्यात आले. त्या निमित्ताने ‘गेटवे ऑफ इंडिया’ची काही रोचक वैशिष्ट्ये…

  • मुंबई बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील सम्राट अशोकाच्या काळापासून वापरांत असलेल्या ‘पल्लव’ बंदराचे नाव ब्रिटिशांनी बदलून वर्ष १६६५ नंतर ‘अपोलो बंदर’ असे केले.
  • येथे वर्ष १९११ मध्ये भारतास भेट देण्यास आलेले ब्रिटीश अधिकारी किंग जॉर्ज पाचवे आणि क्वीन मेरी यांचे स्वागत करण्यासाठी त्यांना एक कमान उभारावयाची होती. त्याप्रमाणे मोगल शैलीतील एक कमान लाकडाचा सांगाडा व प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करून उभारण्यात आली आणि त्यांचे स्वागत करण्यात आले.
  • नंतर तेथे कायमस्वरूपी देखणी कमान उभारण्याचे ठरवून तात्पुरती कमान पाडून टाकली. पक्के बांधकाम करून भारतीय शैलीची कमान उभारण्याचे ठरले. त्यासाठी डिझायनर जॉर्ज विटेट यांनी अनेक डिझाइन्स करून त्यांचे प्रदर्शन भरविले आणि जनतेची त्यावर मते मागितली.
  • जे डिझाइन फायनल झाले, त्याप्रमाणे नवीन कमानीसाठी ३१ मार्च १९१३ रोजी पायाभरणी केली. १९१४ मध्ये ३६ फूट खोल आरसीसी पाया घेऊन प्रत्यक्ष बांधकाम मे १९२० मध्ये सुरु केले.
  • या कमानीसाठी राजस्थानातील खरोडी या ठिकाणाहून मुद्दाम पिवळी छटा असलेला बेसॉल्ट दगड मागविण्यात आला होता. याला तीन कमानी व तीन घुमट असून फरशीपासून उंची 83 फूट आहे.
  • पूर्ण झालेल्या बांधकामाचे उद्घाटन तत्कालीन व्हाइसरॉय अर्ल ऑफ रिडिंग यांच्या हस्ते गुरुवार, ४ डिसेंबर १९२४ या दिवशी मोठ्या थाटामाटांत करण्यात आले.
  • विशेष म्हणजे ‘गेटवे ऑफ इंडिया’चे संपूर्ण बांधकाम रावबहादूर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई या मराठी अभियंत्याने केले. त्या निमित्ताने केवळ मुंबईचे नाही, तर भारताचे प्रवेशद्वार ठरलेल्या या देखण्या आणि एकमेवाद्वितीय अशा ऐतिहासिक वास्तूचा ठेवा मुंबईला मिळाला आहे.

बुधवार, ४ डिसेंबर २०२४ रोजी ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या उद्घाटनाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्या निमित्ताने ‘गेटवे ऑफ इंडिया’ची शताब्दी शासकीय स्तरावर साजरी व्हावी आणि या सोहळ्यात रावबहादूर देसाई यांच्या वंशजांचाही सत्कार केला जावा, अशी मागणी केली जात आहे. (Gateway of India)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.