फुगे मारण्याची विकृती
अनेक ठिकाणी होळीच्या पंधरा दिवस आधीपासूनच पाण्याने भरलेले फुगे मुली आणि महिलांवर फेकले जातात. गाडीतून प्रवास करणाऱ्या कितीतरी प्रवाशांना याचा अनुभव येतो. यातून काहींना जन्माचे वैगुण्य आले आहे. त्या विरोधात कायदे बनवले गेले; पण ते पुरेसे नाहीत. आजही सर्रासपणे फुगे मारण्याचा त्रास होतांना दिसतो, ही एक प्रकारची विकृती म्हणावी लागेल. अगदी शाळेतच या गोष्टीला प्रारंभ होताना दिसतो.
( हेही वाचा : कोकण मंडळाच्या ४७५२ घरांसाठी सोडत! या तारखेपासून सुरू होणार अर्ज )
चोरी, जीवघेणी भांडणे
दुसऱ्या गावातील लाकडे चोरून आणायची आणि त्यासाठी भांडाभांड करायची, यामुळे होळी कलंकित झाली. होळीसाठी वर्गणी काढायची आणि ते पैसे मद्य प्राशन करण्यासाठी वापरले जातात. होळीसमोर बोंबा मारायच्या, अचकट विचकट चाळे करायचे, अशा पद्धतीने काही ठिकाणी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे सुसंस्कृत आणि सभ्य अशा कुणालाही असा सण नकोसा वाटेल, असा प्रकार घडतो.
पर्यावरणाच्या नावाखाली कचरा जाळणे
होळीसाठी लाकडे जाळणे, ही प्रथा आहे. परंतु काही पर्यावरणवाद्यांनी आता पर्यावरणाच्या नावाखाली चुकीचे पायंडे सुरु केले आहेत. हल्ली होळीमध्ये प्लास्टिक पिशव्या, कचरा जाळला जातो. ज्यामुळे खऱ्या अर्थाने वायू प्रदूषण होते. पर्यावरणवादी सध्या पर्यावरणाच्या नावाखाली हिंदूंच्या सणांमध्ये अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी आणत आहेत, ज्यामुळे लोकभावना दुखावत असतात.
रंगाच्या नावाखाली अपायकारक गोष्टींचा वापर
काही ठिकाणी हौद तयार करून त्यामध्ये चिखल बनवला जातो आणि त्यात बुडवण्याची विकृत प्रथा राबवली जाते. ज्यामुळे नाका-तोंडात चिखल जाऊन त्याचा जीवघेणा परिणाम होतो. तर काही ठिकाणी डोक्यात अंडी फोडणे, रासायनिक रंग लावणे, ऑइलपेंट लावले जातात, त्यामुळे अनेकांसाठी विशेषतः महिला आणि तरुणींसाठी हा प्रकार किळसवाणा वाटत असतो.
Join Our WhatsApp Community