Holi Festival : होळी, पर्यावरण आणि पुरोगामीत्व

सध्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ (अंनिस) यासारख्या धर्मद्रोही संघटना आणि निधर्मी राजकारणी वृक्षतोडीचे कारण पुढे करून ‘कचऱ्याची होळी करा’, असा चुकीचा संदेश समाजाला देतात.

203
Holi Festival : होळी, पर्यावरण आणि पुरोगामीत्व
  • सायली डिंगरे

अलीकडे सण-वार उत्सवाप्रमाणे साजर केले जातात. त्या निमित्ताने कुटुंबीय एकत्र येतात, ही भावना त्यामागे नक्की असते. धर्मशास्त्रासह आता काही आधुनिक पद्धतीही सणा-वारांमध्ये घुसडल्या जात आहेत. इतर वेळी पर्यावरण रक्षणाची थोडीही जाणीव नसणारे सणांच्याच वेळी पर्यावरणरक्षणाचे कैवारी होतात. गणेशोत्सव, होळी या काही सणांच्या निमित्ताने तर सगळे पर्यावरणप्रेमी जागे होतात. खरे तर देशातच नव्हे, तर जगभरातच पर्यावरणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करायला हवेतच. त्या प्रयत्नांची आठवण नेमकी हिंदू सणांच्या वेळीच होते, हे हिंदू समाजाचे पुरोगाम्यांनी केलेले ब्रेन वॉश आहे. (Holi Festival)

(हेही वाचा – Swatantrya Veer Savarkar Film : इस्रायलचे राजदूत कोब्बी शोशानी यांच्याकडून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे कौतुक)

हिंदूंचा बुद्धीभेद करणाऱ्या अंनिसला काही प्रश्न

सध्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ (अंनिस) यासारख्या धर्मद्रोही संघटना आणि निधर्मी राजकारणी वृक्षतोडीचे कारण पुढे करून ‘कचऱ्याची होळी करा’, असा चुकीचा संदेश समाजाला देतात. तसेच ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ असे आवाहन करून होळीला अर्पण केल्या जाणाऱ्या पोळ्या गरीबांना वाटण्याचे आवाहन करताना दिसतात. या दोन्ही गोष्टी शास्त्रविसंगत आहेत. अशा तोडक्या मोडक्या प्रयत्नांनी ना हिंदूंना त्या सणाचा आध्यात्मिक लाभ होतो, ना पर्यावरणरक्षणाला हातभार लागतो. पर्यावरणाच्या नावाखाली हिंदूंचा बुद्धिभेद करणाऱ्या अंनिसला काही प्रश्न नक्की विचारावे वाटतात. (Holi Festival)
१. होळी व्यतिरिक्त बाकी वर्षभर होणारी वृक्षतोड अंनिसला दिसत नाही का?
२. अंनिसने वर्षभर होणारी वृक्षतोड किती वेळा रोखली? वर्षभरात किती नवीन रोपटी लावली?
३. देशात आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी कचऱ्याचे व्यवस्थापन ही मोठी समस्या असताना अंनिस त्यासाठी काय करते?
४. अंनिसचे सर्वच ‘सामाजिक’ (?) उपक्रम हिंदू सणांच्या भोवती का अडखळत असतात ?
५. ‘हॅरी पॉटर’ या पुस्तकाच्या लाखो प्रतींसाठी भारतातील आसाममधील तिन्सुकिया येथील एक महत्त्वाचे रान नष्ट झाले. या विषयावर कृती सोडाच, साधे भाष्यही न करणाऱ्या अंनिसला होळी निमित्त होणाऱ्या वृक्षतोडीविषयी बोलण्याचा काय अधिकार?
६. वर्षातून एक दिवस कचरा जाळून (तोही हिंदूंच्या सणाच्या दिवशी) असा कोणता बदल होणार आहे?
७. अंनिसचे किती कार्यकर्ते त्यांचा परिसर, गल्ली कचरामुक्त राखण्यासाठी वर्षभर धडपडतात?
८. होळीमध्ये अग्निदेवतेला अर्पण करायची पोळी गरीबांना वाटायला सांगणारे अंनिसचे कार्यकर्ते गोरगरीबांना पोळ्याच वाटायच्या असतील, तर त्या स्वतंत्रपणे जमा करून का वाटत नाही?
९. अंनिसला हिंदूंच्या सणांच्या आयत्या ‘पिठा’वर सामाजिक कार्याच्या ‘रेघोट्या’ का माराव्याशा वाटतात? (Holi Festival)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: विविध माध्यमांतून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती, पेट्रोलियम कंपन्या करणार वैशिष्ट्यपूर्ण प्रचार; वाचा सविस्तर…)

रक्ताचे पाट पर्यावरणाचे नुकसान करत नाहीत?

जी अंनिस आणि पर्यावरणवादी हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणाच्या बाता करणारे अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी मिठाची गुळणी धरून असतात. बीफची मागणी पुरवताना होणारी असंख्य गोमातांची हत्या पर्यावरणाचे कोणतेही नुकसान करत नाही. ईदच्या वेळी मोहल्ल्यांमध्ये आणि गल्ली-बोळांमध्ये वाहणारे रक्ताचे पाट पर्यावरणाचे नुकसान करत नाही. ‘बीफ खाऊ नका’, ‘बकरी दान करा’, असे आवाहन कोणतेही पर्यावरणवादी करत नाहीत. अंनिसचे कार्यकर्ते ‘बकरी आम्हाला द्या. आम्ही ती गरीबांना देतो’, असे म्हणताना कधी दिसत नाहीत. अन्य पंथीयही कधी त्यांच्या प्रथा-पद्धती टाळून अंनिसवाल्यांच्या बुद्धिभेदाला बळी पडत नाहीत. (Holi Festival)

हिंदू मात्र सणांच्या दिवशी धर्माचरण सोडून पर्यावरणवादी, धर्मद्रोही यांच्या अपप्रचारांना बळी पडतात. आपल्या सणांचे शास्त्र समजून घेऊन ते स्वतः योग्य प्रकारे साजरे करणे आणि हिंदु धर्माला विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमाचे ढोंग करणाऱ्यांचा बुरखा फाडणे, हेच या सर्व ‘वाद्यांना’ खरे उत्तर आहे. (Holi Festival)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.