दिल्लीतील गुन्हेगारी आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यावर आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरले आहेत. त्यांना दिल्ली पोलिसांसह एनआयएला दिल्लीतील गुन्हेगारांच्या टोळ्या संपुष्टात आणण्याचा आदेश दिला आहे.
टोळ्यांतील म्होरक्यांची यादी तयार
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर दिल्ली, हरियाणा, पंजाब, युपीच्या सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या गँग चर्चेत आल्या आहेत. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या आदेशानंतर एनआयएने बिश्नोई आणि बवाना गँगच्या गँगस्टरांची यादीच बनवली आहे. त्यामुळे त्यांची पळता भुई थोडी होणार आहे. एनआयएने बवाना गँग, बिश्नोई टोळीसह 10 गुंडांची यादी बनवली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तपासाची तयारी सुरू करण्यात आली आहे. या टोळ्यांच्या लोकांवरही यूएपीए कलम लावण्यात येणार आहे. यासोबतच दिल्ली-एनसीआरसह हरियाणा, पंजाब, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध टोळ्या एनआयएच्या रडारवर आहेत. अशा सर्व टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी MHA मध्ये अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या, 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान MHA मध्ये 4 ते 5 बैठका झाल्या. या बैठकीत एनआयए, दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल, एमएचए आणि आयबीचे अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा गणेश आगमनाच्याच दिवशी मश्रूम गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला, भाविक संतप्त)
Join Our WhatsApp Community