यावर्षी कार खरेदी करा आणि पुढच्या वर्षी हफ्ते भरा; ‘ही’ कंपनी देतेय अनोखी ऑफर

151

सणांच्या हंगामानिमित्त होंडा कार्स इंडियाने ( Honda Cars India) खरेदीदारांसाठी एक अनोखी ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर्सच्या माध्यमातून खरेदीदार 2022 मध्ये कार खरेदी करु शकतात आणि त्याचे मासिक हफ्ते पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 ला भरु शकतात. कंपनीकडून कार खरेदीसाठी उत्तमरित्या फायनांनसिंगची पुर्णपणे सोय केली आहे. होंडा कंपनीने प्रायव्हेट सेक्टरच्या कोटक महिंद्रा प्राईम लिमिटेडशी एक करार केला आहे, ज्याद्वारे ही ऑफर दिली गेली आहे.

होंडा कंपनीकडून दिली जाणारी ही ऑफर होंडा सिटी आणि होंडा अमेज कार्ससाठी दिली जात आहे. या ऑफर्सचे नाव Drive in 2022, Pay in 2023 असून ही ऑफर ऑथोराईज्ड डीलरशीप आणि देशभरातील KMPL च्या ब्रॅंचमध्ये उपलब्ध आहे.

( हेही वाचा: ‘असा’ करा तुमच्या SIM Cardमध्ये 5G इंटरनेट Activate )

कधीपर्यंत असणार ही ऑफर? 

होंडा कार्स इंडिया तर्फे सुरु असलेल्या या Drive in 2022, Pay in 2023 या ऑफरची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर आहे. या ऑफरच्या माध्यमातून कार खरेदी केल्यास सुरुवातीचे तीन महिने ईएमआय देण्याची गरज नसणार आहे. यानंतर चौथ्या महिन्यांपासून कर्जाची फेड होईपर्यंत खरेदीदाराला ईएमआय भरावा लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.