Honda CL500 Scrambler : होंडाची नवीन सीएल स्क्रँबलर सीरिज भारतात येण्याच्या तयारीत, किंमत ठाऊक आहे का?

होंडा कंपनीच्या स्क्रँबलर मॉडेलना भारतात खूप मोठा इतिहास आहे. १९७० साली कंपनीने पहिली अशी बाईक भारतात आणली होती. 

313
Honda CL500 Scrambler : होंडाची नवीन सीएल स्क्रँबलर सीरिज भारतात येण्याच्या तयारीत, किंमत ठाऊक आहे का?
Honda CL500 Scrambler : होंडाची नवीन सीएल स्क्रँबलर सीरिज भारतात येण्याच्या तयारीत, किंमत ठाऊक आहे का?
  • ऋजुता लुकतुके

होंडा कंपनीच्या (Honda Company) स्क्रँबलर मॉडेलना भारतात खूप मोठा इतिहास आहे. १९७० साली कंपनीने पहिली अशी बाईक भारतात आणली होती. (Honda CL500 Scrambler)

होंडा कंपनी भारतात त्यांच्या सीएल श्रेणीची (CL range) नव्याने सुरुवात करण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात लोकांना प्रतीक्षा आहे ती सीएल स्क्रँबलर ५०० बाईकची. या बाईकमध्ये ४७१ सीसी क्षमतेचं इंजिन आहे. ४६.२ पीएस इतकी ऊर्जा निर्मिती यातून होते. तर ४३.३ एनएम इतकी टॉर्क शक्ती तयार होते. बाईकच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आहे. गाडीची पेट्रोल टाकी १२ लीटर क्षमतेची आहे. (Honda CL500 Scrambler)

होंडाची सीएल श्रेणी ही मध्यम शक्तीच्या बाईकची श्रेणी आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा इटलीतील मिलान इथं कंपनीने पहिल्यांदा ही बाईक लोकांसमोर आणली. तेव्हापासून लूक आणि इंजिनमुळे ही गाडी तरुण तसंच मध्यमवयीन लोकांच्याची पसंतीस उतरली आहे. (Honda CL500 Scrambler)

(हेही वाचा – BMC : मुंबईला विद्रुप करणाऱ्यांवर आणि नियम न पाळणाऱ्या बांधकामांवर होणार कारवाई)

या बाईकचं डिझायनिंग हे १९६०, १९७० च्या दशकातील स्क्रँबलर बाईकसारखंच आहे. पण, अर्थात त्यात आधुनिकता आली आहे. नवीन बाईकला एलईडी दिवे आहेत. गाडीचं इंजिन ४७१ सीसी ट्विन सिलिंडर लिक्विड कूल इंजिन आहे. तर ३१० मिमी फ्लोटिंग डिस्क ब्रेकचं काम सांभाळते. सहा गिअर असलेली गिअर प्लेट आहे. आणि एकूण सहा रंगात ही गाडी उपलब्ध असेल. (Honda CL500 Scrambler)

बाईकची किंमत भारतात ६,००,००० रुपयांपासून सुरू होईल. या बाईकची स्पर्धा असेल ती बेनेली लिओसिनो ५०० या बाईकशी. (Honda CL500 Scrambler)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.