एक सर्वसाधारण पत्रकार आणि व्यंगचित्रकार आपल्या माणसांवर होणार्या अन्यायाविरोधात खळवळून उठतो आणि पाहता पाहता लोकनेता होतो हा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. बाळासाहेब कोण? तर हिंदुत्वाचे सरसेनापती. ज्या काळी हिंदू शब्द उच्चारणे पाप मानले जायचे त्या काळात बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) मुंबईतून हिंदुत्वाचा किल्ला लढवला. “फ़्री प्रेस जर्नल” या लोकप्रिय इंग्रजी वृत्तपत्राविरोधात बंड करुन बाळासाहेबांनी १९६० मध्ये “मार्मिक” हे मराठीतील पहिलंवहिलं व्यंगचित्र साप्ताहिक काढलं. त्यामुळे दक्षिण भारतियांकडून मराठी भाषिकांना कसे दाबले जात आहे, याची जाण मराठी भाषिकांना झाली.
मराठी माणसाच्या रक्षणासाठी शिवसेनेचा जन्म
मार्मिकच्या माध्यमातून मराठी माणूस व्यक्त होऊ लागला. “उठाओ लूंगी बजाओ पूंगी” ही घोषण खूप गाजली. यातून एक चळवळ निर्माण झाली. दक्षिण भारतीयांविरोधात चळवळीतून आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी शिवसेनेचा जन्म झाला. १९६६ च्या विजयादशमीला शिवसेनेची पहिली जाहीर सभा म्हणजेच दसरा मेळावा झाला. “राजकारण हे गजकरण आहे, म्हणून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हाच शिवसेनेचा अजेंडा राहिल” असे बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) त्यांच्या भाषणात सांगितले. परंतु काळाच्या ओघात त्यांनी राजकारणालाच महत्व दिले.
(हेही वाचा Muslim : मीरा रोडप्रमाणेच मुंबईतील परळ, सांताक्रूझमध्येही धर्मांध मुसलमानांचा दंगल घडवण्याचा होता कट)
बाळासाहेबांचे स्वप्न धुळीस मिळवले
१९६७ मध्ये शिवसेनेने ठाणे महापालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि १९६८ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवल्या. १९७० मध्ये हेमचंद्र गुप्ते महापौर झाले व १९७३ मध्ये सुधीर जोशी. आता शिवसेना एक चळवळ राहिली नव्हती तर तो एक राजकीय पक्ष झाला होता. १९९५ मध्ये राज्यात शिवसेना -भाजप युतीची सत्ता आली. तेव्हा बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) ठरवलं असतं तर ते सहज मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण मंत्रालयात बसून फायली चाळत बसणे हे बाळासाहेबांच्या रक्तातच नव्हते. त्यांना मुख्यमंत्रीच्या खूर्चीपेक्षा शिवसेनाप्रमुख हे पद अधिक प्रिय होते. पण उद्धव ठाकरेंनी हीच चूक केली आणि बाळासाहेबांचं स्वप्न धुळीस मिळवलं.
४-५ दशकं महाराष्ट्रभर बाळासाहेबांनी राज्य केलं
एक जबरदस्त राजकारणी, सर्वोत्तम व्यंगचित्रकार आणि करारी माणूस म्हणून शिवसेनाप्रमुखांची ओळख आहे. त्यांचे अनेक लोकांशी राजकीय वाद असूनही त्यांचे सगळ्यांशी वैयक्तिक संबंध खूपच चांगले होते. हाच वेगळेपणा त्यांच्या सुपुत्राला जपता आला नाही. भारतीय सैनिकांनी सिंधू नदी मुक्त करावी, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. “सगळे जग जरी आमच्या विरोधात गेले तरी एकटा मराठी माणूस सिंधू नदीला मुक्त करेल.” असे सावरकर म्हणाले होते. म्हणूनच बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मराठी माणसाचे संघटन केले. ४-५ दशकं महाराष्ट्रभर बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) राज्य केलं आणि लोकांच्या मनात तर ते आजही राज्य करीत आहेत. आज त्यांचा जन्मदिवस. या निमित्ताने त्यांना मानवंदना!
Join Our WhatsApp Community