कोरोनानंतर पुन्हा रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. देशात 2021 मध्ये चार लाखांवर रस्ते अपघात झाले आहेत. त्यात 1 लाख 55 हजार 622 जणांचा बळी गेला असून, त्यातील 50 टक्के लोक कमावत्या वयातील असल्याचे धक्कादायक वास्तव एनसीआरबी (NCRB)च्या अहवालातून समोर आले आहे. अपघाती बळींमध्ये पुरुषांचे प्रमाण 86 टक्के आहे. घरातील कर्ती- धर्ती व्यक्ती अपघातात जात असल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर येत आहेत.
‘या’ महिन्यात सर्वाधिक अपघात
नववर्षांचा पहिलाच महिना म्हणजे जानेवारीमध्ये सर्वाधिक रस्ते अपघात घडतात. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्येही रस्ते अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. सर्वात कमी अपघात मे महिन्यात झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
( हेही वाचा Video: पंतप्रधान मोदींच्या आईबाबत ‘आप’च्या नेत्याने केलं आक्षेपार्ह विधान; भाजप आक्रमक )
अपघाताची कारणे आणि त्यांची टक्केवारी
- अतिवेगाने वाहने चालवणे -55.9 टक्के
- ड्रग्ज, मद्य घेऊन वाहन चालवणे- 1.9 टक्के
- धोकादायक, काळजी न करता वाहन चालवणे -27.5 टक्के
- हवामान खराब असणे- 3.5 टक्के
- वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड- 1.3 टक्के
- इतर कारणे 9.9 टक्के