Amajad Khan यांना गब्बर सिंगची भूमिका करण्याची संधी कशी मिळाली?

91
अमजद खान (Amajad Khan) हे नाव समोर येताच आपल्याला आठवतो शोलेमधला गब्बर सिंग. शोले चित्रपटतील प्रत्येक पात्र लक्षात राहतं. शोले हा खूप चांगला चित्रपट आहे असे नव्हे. पण मसाला चित्रपटांच्या शर्यतीत शोलेचा अव्वल क्रमांक लागतो. या चित्रपटामुळे अमजद खान यांना प्रसिद्धी मिळाली. खरंतर १९५१ साली आलेल्या नाझनीन या चित्रपटात अमजद खान यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते. तेव्हा ते ११ वर्षांचे होते. हा चित्रपट १९५१ मध्ये प्रदर्शित झाला होता. पुढे १७ वर्षांनंतर त्यांनी ’अब दिल्ली दूर नही’ या चित्रपटात काम केले.
शोले चित्रपटाच्या आधी त्यांना फारसे कुणी ओळखत नव्हते. खरंतर त्यांचे वडील जयंत म्हणजेच झकारिया खान हे अभिनेते होते. पुढे त्यांनी चित्रपट निर्माते के. आसिफ यांचा असिस्टंट म्हणून लव्ह अँड गॉड या चित्रपटात काम केले.  १९७१ मध्ये आसिफ यांचा मृत्यू झाला, त्यामुळे हा चित्रपट १९८६ मध्ये प्रदर्शित झाला. दरम्यान, १९७३ मध्ये त्यांनी हिंदुस्थान की कसम या चित्रपटातही छोटी भूमिका केली होती.
यानंतर अमजद खान (Amajad Khan) यांना १९७५ मध्ये ‘शोले’ चित्रपटात खलनायकाची भूमिका मिळाली. हाच त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. ‘शोले’ चित्रपटात त्यांनी डाकू गब्बर सिंगची भूमिका साकारली होती. अमजद खान यांनी या चित्रपटातील संवादामध्ये अशी काय जादू भरली की लोक त्यांच्या प्रेमात पडले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची प्रमुख भूमिका असूनही प्रेक्षकांनी अमजद खानच्या अभिनयाचे खूप कौतुक केले.
कितने आदमी थी, जो डर गया समझो मार गया आणि तेरा क्या होगा कालिया यांसारखे संवाद भारतीय चित्रपट इतिहासात अजरामर झाले. ‘शोले’ हा चित्रपट अमजद खान यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी आधी डॅनीचा विचार करण्यात आला होता. पण डॅनी त्यावेळी धर्माचा हा चित्रपट करत होते. त्यामुळे या भूमिकेसाठी कोणाला घ्यायचं असा विचार सुरु असतानाच मागे एकदा जावेद अख्तर यांनी सलीम खान यांना अमजद खानबद्दल सांगितले होते.
झालं असं की जावेद अख्तर यांनी अमजद खान यांचं एक नाटक पाहिलं होतं. तेव्हा ते सलीम खान यांना म्हणाले की अमजद म्हणून एक मुलगा आहे. खूप छान काम करतो. पण तेव्हा या नावाचा फारसा विचार झाला नाही. मात्र शोले चितपटाच्या वेली डॅनीने नकार दिल्यानंतर सलीम खान यांना आठवण झाली की अख्तर यांनी अमजद नावचया मुलाबद्दल सांगितले होते. सलीम खान यांनी विचारणा करताच जावेद अख्तर यांनी अमजद खान यांना बोलावून घेतले आणि अशाप्रकारे हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाला एक गब्बर कलाकार. आज १२ नोव्हेंबर अमजद खान यांचा वाढदिवस. तुम्हाला शोलेमधला अमजद खान (Amajad Khan) यांचा कोणता डायलॉग आवडतो?
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.