स्पेलिंग चुकली आणि Google हे नाव पडलं; गुगलच्या जन्माची गंमतीदार कथा

139

आज गुगल हे खूप मोठं सर्च इंजिन आहे. गुगल नसेल तर आपण काम करु शकत नाही हे सत्य आहे. या कंपनीने जणू जगारच ताबा मिळवला आहे. परंतु गुगलचे आज नाव कितीही मोठे असले तरी गुगलच्या जन्माची कथा खूपच गमतीदार आहे. चुकून एखादी चांगली गोष्ट घडते असा प्रकार गुगलच्या बाबतीत झाला आहे.

गुगलची सुरुवात लॉन्च करण्याच्या दोन वर्षे आधीपासूनच झाली असली तरी ४ सप्टेंबर १९८८ मध्ये एका इव्हेंटमध्ये याची अधिकृत घोषणा करण्यात आली. सुरुवातीला BackRub असं या प्रकल्पाचं नामकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र या नावात मोठा बदल घडवण्यात आला.

BackRub चं नाव बदलून Googol असं नामकरण झालं. पण गलती से मिस्टेक हो गया! म्हणजे लिहिताना स्पेलिंग चुकली आणि Google असं लिहिलं गेलं. आता ही चुकीची स्पेलिंग जगावर अधिराज्य गाजवत आहे. सर्गेई ब्रिन आणि लॅरी पेज हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे पीएचडी चे विद्यार्थी होते.

(हेही वाचा फेसबुकवर झाली मैत्री, हाॅटेलवर गेली आणि बंदुक, दागिने घेऊन पळाली )

या दोन बिलंदरांनी एक प्रकल्प सुरु केला, ज्याचे नाव BackRub होते. परंतु नंतर या प्रकल्पाचे नाव गुगल ठेवण्यात आले. आज गुगलची एका दिवसाची कमाई ५ अरब पेक्षाही अधिक आहे. हे सर्च इंजिन प्रचंड लोकप्रिय आहे. भारतात तर गुगलशिवाय काम होत नाही. एका क्लिकवर गुगल तुम्हाला सगळी माहिती तुमच्यासमोर आणून ठेवते. भारतात गंमतीने गुगलला “गुगल बाबा” म्हणतात. कारण प्रत्येक गोष्टीचं उत्तर गुगलकडे असतं.

गुगलचं डोमेन रेजिस्ट्रेशन १५ सप्टेंबर १९९७ रोजी करण्यात आले. सध्या सुंदर पिचाई हे गुगलचे सीईओ आहेत. महत्वाचं म्हणजे सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे असून २००४ मध्ये त्यांनी या कंपनीत प्रवेश केला आणि २०१४ पासून ते सीईओ ची धुरा सांभाळत आहेत. प्रति वर्ष सुमारे १७०० कोटी त्यांना गुगलकडून मिळतात. ही गुगलची ताकद आहे.

(हेही वाचा जम्मू- कश्मीरमध्ये हिंदू कुटुंबांवर दहशतवादी हल्ला; 4 जणांचा मृत्यू, तर 9 जखमी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.