Google तुमच्या आवडी-निवडी कसे ओळखते ? जाणून घ्या Algorithm चा खेळ!

गुगल हे माहितीच्या महाजालातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. अलिकडे काही अडले तरी आपण लगेच गुगल करतो मात्र आपण जेव्हा एखादी गोष्ट गुगल करतो तेव्हा आपल्या Suggestion list त्याच विषयाच्या जाहिराती दिसू लागतात. असे का होते?

( हेही वाचा : SBI बॅंकेने ग्राहकांना दिल्या या ५ टिप्स! लहानशी चूकही करू शकते तुमचे बॅंक खाते रिकामे, जाणून घ्या… )

दोन मित्रांनी नवीन कार घेण्यासंदर्भात फोनवरून चर्चा केली तर त्यांच्या क्रोम ब्राउझर आणि फेसबुकवर नव्या गाड्यांच्या जाहिराती दिसू लागतात. परंतु फोनवरील होणारी चर्चा व्हॉइस असिस्टंट पर्याय सुरू न करताही गुगलला कशी समजते असा प्रश्न युझर्सकडून उपस्थित होऊ लागला आहे. खरेतर गुगलच्या Privacy Policy नुसार कोणीही युझरच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घेऊ शकत नाही. परंतु युझरच्या गरजा पाहून गुगल, फेसबुकवर सर्च केलेल्या जाहिराती दिसू लागतात. अनेक युझरच्या मनात प्रश्न निर्माण होतो गुगल आपल्या गप्पा ऐकते का ? जाणून घ्या याचे उत्तर…

याचे कारण काय?

गुगल आपल्या गप्पा ऐकते कारण डिव्हाइस सिंक होणे हे कारण असू शकते.

काही युझर अनेक डिव्हाइससाठी एकच गुगल अकाउंट वापरतात त्यामुळे डिव्हाइसवर काही सर्च केले तर त्यानुसार अल्गोरिदमद्वारे( Algorithm) गुगल ग्राहकाच्या पसंतीनुसार जाहिराती दाखवते.

अल्गोरिदममुळे युझरच्या आवडीनिवडीच्या गोष्टी गुगल आणि फेसबुकवर दिसू लागतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here