महिलेला सुद्धा ‘राष्ट्रपती’च का म्हणतात? हे आहे उत्तर

नुकत्याच द्रौपदी मुर्मू यांची देशाच्या 15व्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. 25 जुलैला मुर्मू राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. देशातील सर्वोच्च पदावर विराजमान होणा-या आदिवासी समाजातील त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. तसेच प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर हा मान पटकावणा-या त्या दुस-या महिला आहेत.

पण मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर आता एक चर्चा ऐकायला मिळत आहे. राष्ट्रपती हा पुल्लिंगी(Masculine) शब्द असल्याने, एका महिलेची राष्ट्रपतीपदी निवड झाली तर त्यांना राष्ट्रपतीच का म्हणतात, हा प्रश्न सध्या काही जणांना पडत आहे. सोशल मीडियावर सुद्धा याबाबत चर्चा आहे. तसं बघायला गेलं तर या शंकेत तथ्य आहे, पण याबाबत घटनातज्ज्ञांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

जेंडर न्यूट्रल शब्द

राज्यघटनेच्या कलम 60 मध्ये राष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आली आहे. इंग्रजीमध्ये या पदाला President म्हटले जाते. इंग्रजी भाषेत अनेक पुल्लिंगी शब्द हे जेंडर न्यूट्रल झाले आहेत. उदा. एखाद्या संस्थेच्या संचालकपदी जर महिलेची निवड झाली तर तिला इंग्रजीत Chairman असेच म्हटले जाते. तसेच मराठीतही काही शब्द हे जेंडर न्यूट्रल आहेत.

घटनात्मक पद

आता राष्ट्रपती पद हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे President चे भाषांतर राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष असे होते आणि तेच नाव पूर्वापार प्रचलित झाले आहे. हा शब्द सुद्धा जेंडर न्यूट्रल असल्यामुळे या पदावर बसणा-या कुठल्याही व्यक्तीला राष्ट्रपती असेच संबोधले जात असल्याचे घटनातज्ञांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here