1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा केला जातो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना या दिवशी अभिवादन करण्यात येते. 1 मे 1960 पूर्वीचा महाराष्ट्र हा आताच्या महाराष्ट्रापेक्षा खूप वेगळा होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार झालेल्या सुरुवातीच्या 14 राज्यांत महाराष्ट्राचा म्हणजेच तेव्हाच्या बॉम्बे प्रांताचा समावेश होता.
(हेही वाचाः युद्धातही देशाच्या मदतीला धावून आली होती ‘एसटी’)
पण त्यानंतर 1960 साली झालेल्या बदलांमुळे महाराष्ट्राचं रूप पालटलं. बॉम्बे प्रांतातील काही भाग वेगळा करुन, गुजरात राज्य नव्याने स्थापन झालं. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या बॉम्बे प्रांतातील भाग कमी करुन गुजरातची नव्याने निर्मिती झाली. तर 1956 च्या कायद्यानुसार तयार झालेला बॉम्बे प्रांत महाराष्ट्र म्हणून उदयाला आला. त्यामुळेच गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचा स्थापना दिवस हा 1 मे आहे.
(हेही वाचाः भारतातल्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण? माहीत आहे का?)
द्विभाषिक मुंबई राज्य
राज्य पुनर्ररचना कायदा, 1956 नुसार स्वतंत्र भारतात एकूण 14 राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेशांची . यामध्ये बॉम्बे प्रांताचा समावेश होता. तेव्हा बॉम्बे प्रांताला द्विभाषिक मुंबई राज्य म्हटले जात होते. त्यावेळी यात सध्याच्या गुजरात राज्यातील सौराष्ट्र आणि कच्छ या भागांचा देखील त्यात समावेश होता. पण नंतर झालेल्या भाषावार राज्य रचनेनुसार, गुजराती भाषिकांसाठी गुजरात हे 15वे राज्य नव्याने स्थापन करण्यात आले. तर मराठी भाषिक लोकसंख्या सर्वाधिक असलेल्या बॉम्बे प्रांताचे नाव महाराष्ट्र असे झाले.
(हेही वाचाः पवार आणि राष्ट्रपती राजवटीचं ‘हे’ आहे जूनं ‘कनेक्शन’, महाराष्ट्रात त्याचं पुन्हा होणार ‘दर्शन’?)
या जिल्ह्यांचा होता समावेश
द्विभाषिक मुंबई राज्यात सध्याच्या गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र हा भाग होता. तर अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, चांदा(चंद्रपूर) या जिल्ह्यांचा, तर पूर्वीच्या निजाम(हैद्राबाद) संस्थानातील औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होता. 1 मे 1960 ला स्थापन झालेल्या महाराष्ट्रात एकूण 26 जिल्हे, 235 तालुके आणि 289 शहरे होती. तर मुंबई(कोकण), पुणे, औरंगाबद आणि नागपूर असे चार प्रशासकीय विभाग होते.
(हेही वाचाः ‘या’ चुका झाल्या नसत्या तर सचिनच्या नावावर 102 सेंच्युरी असत्या)
Join Our WhatsApp Community