देशभरात साडेसहा लाख मंदिरे! महाराष्ट्रात किती? आयआयटी प्राध्यापकांच्या अहवालातील माहिती

165

सध्या ज्ञानवापी प्रकरणावरून हिंदूंच्या मंदिरांचा विषय जगभरात चर्चेला आला आहे. अशा वेळी बहुसंख्य हिंदूंची देशभरात नक्की किती मंदिरे आहेत, असाही प्रश्न यानिमित्ताने सर्वसाधारण व्यक्तीला पडल्याशिवाय राहणार नाही. याचे उत्तर मात्र आयआयटीच्या प्राध्यापकाने दिले आहे. त्यांनी देशभरात एकूण किती मंदिरे आहेत आणि कोणत्या राज्यात किती हिंदूंची मंदिरे आहेत, याची आकडेवारी दिली आहे. प्राध्यापक गणेश रामकृष्णन यांनी ‘धर्मविकी प्रोजेक्ट’च्या माध्यमातून हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल https://templesofindia.org/aboutUs या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोणी केला हा अहवाल?

आयआयटी मुंबईतील काही विद्यार्थ्यांचा चमू प्रा. गणेश रामकृष्णन यांच्या माध्यमातून तयार झाला आहे. त्यांनी त्यांच्या ग्रुपला ‘टेम्पल ऑफ इंडिया’ असे नाव दिले आहे. या अंतर्गत ‘धर्मविकी प्रोजेक्ट’ तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत देशभरातील मंदिरांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या कोअर कमिटीमध्ये आयुष महेश्वरी, अरुण जयरामकृष्णन, प्रा. सकेथा नाथ, प्रा. रवी पुविहा, अंजय गोयल, सिद्धार्थ राजा, अमन कुमार आणि अर्जुन साबळे यांचा समावेश आहे. देशभरातील मंदिरांची माहिती संकलित करणे असा ‘टेम्पल ऑफ इंडिया’ चा उद्देश होता.

report

(हेही वाचा पीएफआयची २३ खाती ईडीकडून सील, मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून कोट्यवधींचा व्यवहार)

काय म्हटले आहे या अहवालात?

  • भारतात हिंदूंची एकूण ६ लाख ४८ हजार ९०७ मंदिरे आहेत
  • महाराष्ट्र – ७७,२८३
  • गुजरात – ४९,९९५
  • राजस्थान – ३९,३९२
  • मध्य प्रदेश – २७,९४७
  • उत्तर प्रदेश – ३७,५१८
  • दिल्ली – ५,३६७
  • हरियाणा – १०,३२९
  • पंजाब – ४,८२७
  • हिमाचल – ४,५६०
  • पंजाब – ४,८२७
  • उत्तराखंड – ३,६९५
  • जम्मू – काश्मीर – ४७०
  • बिहार – २९,७४८
  • सिक्कीम – ८७
  • आसाम – ५,३९४
  • अरुणाचल – ९६
  • नागालँड – ४३
  • मणिपूर – ४४१
  • मिझोराम – ३२
  • त्रिपुरा – ५६८
  • मेघालय – १२८
  • बंगाल – ५३,६५८
  • झारखंड – १४,६८०
  • ओडिसा – ३०,८७७
  • छत्तीसगड – ९,४८४
  • मध्य प्रदेश – २७,९४७
  • तेलंगणा – २८,३१२
  • गोवा – १,८५५
  • कर्नाटक – ६१,२३२
  • आंध्र प्रदेश – ४७,१५२
  • केरळ – २२,९३१
  • तामिळनाडू – ७९,१५४
  • पॉंडिचेरी – १,२०१

(हेही वाचा सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अडचणी वाढवणारे नॅशनल हेराल्ड प्रकरण आहे तरी काय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.