काली चित्रपट: आणखी किती दिवस हिंदूंनी आपल्या देवतांचा अपमान सहन करायचा आहे?

95

काली या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा हिंदुंच्या भावनांचा अपमान करण्यात आला. लीना मणिमेकलईच्या या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरमध्ये काली मातेला सिगरेट पिताना दाखवलं आहे. त्याचबरोबर मातेच्या हातात एलजीबीटी समुदायाचा सतरंगी झेंडा दाखवण्यात आलेला आहे. दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिट ने ’काली’ या माहितीपटाच्या पोस्टरच्या बाबतीत आयपीसी कलम १५३ए आणि २९५ए अंतर्गत एफआयआर केलेला आहे. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी देखील याविरोधात केस दाखल केली आहे.

( हेही वाचा : दिलखुलास एकनाथ शिंदे, एका नव्या नेतृत्वाचा उदय…)

नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर टिपण्णी केली आणि त्यांना मृत्यूची धमकी येण्यास सुरुवात झाली. नुपूरला समर्थन देणारे पोस्ट्स केले म्हणून दोन निष्पाप लोकांची गळा चिरुन हत्या करण्यात आली. परंतु हिंदू देवदेवतांचा व हिंदू प्रतिकांचा अपमान करण्याची सेक्युलर परंपरा आहे. तरी देखील हिंदू सहिष्णूपणे सगळं सहन करतात, प्रतिकार सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक आणि लोकशाही मार्गाने करतात. एवढं होऊन सुद्धा यांना हिंदू हे अतिरेकी वाटतात ही विकृती नव्हे का?

भारत हा असा एकमेव देश आहे जिथे बहुसंख्या लोकांच्या भावना पायदळी तुडवल्या जातात, जिथे बहुसंख्य लोक सतत घाबरलेल्या मानसिकतेत वावरतात. हिंदू हा घाबरलेला आहे. कारण तो भित्रा आहे म्हणून नव्हे तर त्याला आयुष्यात काहीतरी करुन दाखवायचं आहे, त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या देशासाठी… त्याला त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करायचं आहे आणि सामाजिक कार्य देखील करायचं आहे. त्याला दंगली घडवायच्या नाहीत, कारण त्याला वसुधैव कुटुंबकम हे शिकवलं गेलं आहे. त्याला सर्व जाती-धर्मावर प्रेम करायचं आहे कारण विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्वर त्याचे आदर्श आहेत.

असं असून देखील सतत हिंदूंच्या भावनांना पायदळी तुडवलं जातं. हिंदूंना भावना नसतात का? त्यांच्या देवदेवतांचा अपमान का होत असतो? आता जर हे थांबवायचं असेल तर हिंदूंनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक मार्गाने एकजूट केली पाहिजे. हिंदू मानवाधिकार समिती नावाची एखादी संघटना असायला हवी. जी हिंदूंच्या मानवाधिकाराचा विचार करेल. कारण अनेकांना असं वाटतं की हिंदूंना मानवाधिकार नाही. हिंदू जर लोकशाही मार्गाने एकत्र आले नाहीत तर हिंदूंच्या भावना अशाचप्रकारे दुखावल्या जातील आणि आपण सद्गुण विकृतीला चिकटून बसू व एक दिवस आपण हिंदू म्हणून जगण्यास अपात्र ठरु…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.