‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा’ हे श्यामलाल गुप्त पार्षद यांचं गीत सत्यात उतरवणारे अनेक वीर आहेत, कर्तृत्ववान लोक आहेत आणि त्याचबरोबर परदेशात राहूनही भारताचा झेंडा उंच फडकवणारे भारतीय वंशाचे दिग्गज आहेत. सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे ऋषी सुनक. ते ब्रिटनचे पंतप्रधान आहेत.
पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगभरात सुमारे १५ देशांमध्ये २०० भारतीय वंशाचे लोक आहेत जे आपल्या कर्तृत्वाच्या इतर देशात सर्वोच्च राजकीय पद उपभोगत आहेत. इतकंच काय तर ६० लोक विविध देशांमध्ये कॅबिनेट स्तरातील पदांचा भार उपभोगत आहेत. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती झाल्या. त्या भारतीय वंशाच्या आहेत.
(हेही वाचा मढ, एरंगल, भाटीमधील ५ अनधिकृत फिल्म स्टुडिओवर बुलडोझर)
कमला हॅरिस अमेरिकेच्या इतक्या मोठ्या स्थानी पोहोचणार्या पहिल्या भारतीय महिला आहेत. भरत जगदेव २०२० मध्ये गुयानाच्या उपराष्ट्रपतीपदावर विराजमान झाले. २३ जानेवारी १९६४ मध्ये त्यांचा जन्म झाला. ते भारतीय हिंदू वंशाचे आहेत. त्यांचं मूळ उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये आहे. १९१२ रोजी भरत जगदेव यांचे आजोबा राज जियावन यांना मजूर म्हणून इंग्रजांनी गुयानामध्ये नेलं आणि आज भरत जगदेव त्या देशाचे उपराष्ट्रपती झाले आहेत. ऍंटोनियो कोस्टा ह्या पोर्तुगालच्या पंतप्रधानांचे मूळ गोव्यात आहे. कोस्टा यांचे वडील ओरलॅंडो द कोस्टा यांचा जन्म गोव्यातील भारतीय कुटुंबात झाला होता. मात्र त्यांनी आई मारिया ऍंटोनिया पाला पोर्तुगालच्या आहेत. ऍंटोनिया कोस्टा यांनी २०२२ मध्ये विजय मिळवला आणि तिसर्यांदा पंतप्रधान झाले.
Join Our WhatsApp Community