Dhirubhai Ambani International School : सेलिब्रिटी मुलं जिथं जातात त्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचं शुल्क किती आहे?

Dhirubhai Ambani International School : किंडरगार्टन ते बारावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय इथं आहे

176

रिलायन्स समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani International School) यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचा मोठा मुलगा मुकेश अंबानीने २००३ मध्ये मुंबईत वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स इथं धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळा सुरू केली. आपली आई कोकिलाबेन अंबानी आणि पत्नी नीता अंबानी या दोघी शाळेच्या ट्रस्टी आहेत. मुंबई शहरात अद्ययावत शिक्षण आणि सर्वागीण विकासासाठी आवश्यक कौशल्य मुलांना शिकता यावीत यासाठी ही शाळा सुरू करण्यात आली होती.

अर्थात, इथल्या सोयी पंचतारांकित त्यामुळे शिकायला येणारी मुलंही सुरुवातीपासून श्रीमंत किंवा उच्च मध्यमवर्गीयच होती. खासकरून बॉलिवूडचे स्टार आणि क्रिकेट स्टारची मुलं ही अगदी सुरुवातीपासून या शाळेचे विद्यार्थी होते. अशी ही शाळा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय आणि अत्याधुनिक आहे. शाळेच्या टेरेसवरही एक सुंदर बगीचा आहे. आणि त्या शिवाय शाळेच्या आवारात ठिकठिकाणी उद्यानं, खेळायची मैदानं आणि विरंगुळा तसंच करमणुकीची साधनं आहेत. शाळेत दोन मोठे कॅफेटेरिया आहेत, जिथे फक्त शाकाहारी आहारच पुरवला जातो.

(हेही वाचा BMC : सोमवारची सुट्टी बदलल्याने रजेवर गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच)

शाळेच्या ग्रंथालयात ४०,००० च्या वर पुस्तकं आणि तितकीच दृक्- श्राव्य माध्यमातील साहित्य आहे. मुलांच्या आरोग्यासाठी २४ तास सुरू असलेलं एक वैद्यकीय केंद्र आहे. आधुनिक आणि पूर्णपणे संगणकीकृत झालेल्या प्रयोगशाळांबरोबरच इथं आंतरराष्ट्रीय स्टेज, भारतीय संगीत, नृत्य, योगा तसंच विविध खेळांसाठीही सोयी आहेत. मुलांच्या वार्षिक सोहळ्यासाठीही अनेकदा अंबानी कुटुंबीयं तसंच बॉलिवूड स्टार हजेरी लावतात. (Dhirubhai Ambani International School)

अशा या शाळेचं वार्षक शुल्कही तगडंच असणार याचा अंदाज एव्हाना तुम्हाला आलाच असणार. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत पहिली ते सातवी पर्यंत तुम्हाला १,७०,००० रुपये इतकं शैक्षणिक शुल्क आकारलं जातं. म्हणजेच दर महिन्याचं शुल्क साधारण १४,००० रुपये इतकं आहे. आठवी ते दहावीसाठीचं वार्षिक शुल्क ५,९०,००० रुपये तर अकरावी आणि बारावीचं शैक्षणिक शुल्क ९,६५,००० रुपये इतकं आहे. हे शुल्क चालू शैक्षणिक वर्षासाठी आहे. त्यात बदल होऊ शकतो. (Dhirubhai Ambani International School)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.