Google च्या CEO ला किती असतो पगार? वाचून व्हाल थक्क!

42
Google च्या CEO ला किती असतो पगार? वाचून व्हाल थक्क!
Google च्या CEO ला किती असतो पगार? वाचून व्हाल थक्क!

अनेक कंपन्यांमध्ये ceo हे पद असतं. google ही जगातली सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी आहे. या कंपनीचे ceo कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे ला? गुगलचे सध्याचे सीईओ सुंदर पिचाई आहेत. १० ऑगस्ट २०१५ पासून ते या पदावर आहेत आणि डिसेंबर २०१९ मध्ये Google ची मूळ कंपनी, Alphabet Inc. चे देखील ते सीईओ झाले.

सुंदर पिचाई यांचा जन्म मदुराई, तमिळनाडू येथे झाला आणि नंतर ते अमेरिकेत गेले. आयआयटी खरगपूर, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि व्हार्टन स्कूल ऑफ दि युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियामधून पदवी प्राप्त केली आहे. Google Chrome, ChromeOS, Google Drive, Gmail आणि Google Maps यासह अनेक महत्त्वाच्या Google उत्पादनांच्या विकासात पिचाई यांचा मोलाचा वाटा आहे.

(हेही वाचा- Helicopter Crash: गुजरातच्या पोरबंदरमध्ये तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, 3 ठार)

ओइचाई यांच्या नेतृत्वाखाली, Google ने विशेषत: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड कंप्युटिंगच्या क्षेत्रात, त्यांच्या उत्पादनामध्ये नवनवीन शोध आणि विस्तार करणे सुरू ठेवले आहे. त्यामुळे पिचाई हे एक यशस्वी सीईओ म्हणून समोर आले आहेत.

सुंदर पिचाई, कंपनीच्या एकूण धोरणात्मक दिशा, दृष्टी आणि संचालनावर देखरेख आणि मार्गदर्शन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सुंदर पिचाई यांची जबाबदारी पुढीलप्रमाणे आहे: इनोव्हेशनवर भर देऊन नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञानाचा विकास करणे, कंपनीच्या आर्थिक कामगिरीचे व्यवस्थापन करणे आणि लाभ वाढवणे, नवीन प्रतिभेचा शोध घेणे, कम्पनीत सकारात्मक संस्कृती निर्माण करणे, गुंतवणूकदार, बोर्डचे सदस्य, कर्मचारी आणि इतर भागधारकांशी सुसंवाद साधणे, कंपनीच्या यशासाठी जोखीम ओळखणे आणि ती कमी करणे, Google चा सार्वजनिक चेहरा म्हणून काम करणे, मीडिया आणि कार्यक्रमांमध्ये कंपनीचे प्रतिनिधित्व करणे.

(हेही वाचा- लडाखवर Chinaचे बेकायदेशीर नियंत्रण भारताला मान्य नाही; परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सुनावले)

आता तुम्हाला आम्ही महत्त्वाची बाब सांगणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुंदर पिचाई यांना पगार किती आहे. त्यांना मिळणारा पगार वाचून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. तर वाचकहो, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना २०२४ पर्यंत अंदाजे $४२४ दशलक्ष एवढा पगार मिळतो. यात त्यांचे मूळ वेतन आणि अतिरिक्त स्टॉक अवॉर्ड्सचा समावेश आहे. त्यांना खूप पगार मिळत असला तरी त्यांचं कामही खूप महत्त्वाचं, जोखमीचं आणि जबाबदारीचं आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.