वादात सापडलेले मुंबई पोलीस प्रशासन कोण-कसे चालवते? जाणून घ्या!!

सर्वसामान्यांना मुंबई पोलिसांबद्दल आदर आहे, तो असा काही मोजक्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे निश्चितच कमी होणार नाही. मात्र सध्याच्या चर्चेमुळे जनसामान्यांना मुंबई पोलीस दलाची नक्की कशी रचना आहे, हे जाणून घ्यायचे आहे. 

257

मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर. देशाची आर्थिक राजधानी. सर्व महत्वाची केंद्रे या शहरात. साहजिकच हे शहर संवेदनशील. त्यामुळेच शहराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणे मुंबई पोलिसांसाठी कायम आव्हानाचे. रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे अटकेत आहेत. यामुळे आधीच मुंबई पोलीस बदनाम होऊ लागले आहे. त्यातच मुंबई पोलीस आयुक्त पदावर हटवण्यात आलेले परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे सचिन वाझे यांना ‘दर महिना १०० कोटी रुपये वसूल करून आण’, असे सांगत होते, अशा आशयाचे पत्र लिहिल्याने खळबळ उडाली. महिन्याला १०० कोटी एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याकडे मागणी केली जात होती, तर मुंबई पोलीस दलात किती पोलीस अधिकारी आहेत, कोणत्या पदाचे आहेत, त्यांना किती ‘टार्गेट’ असते, मुंबई पोलीस दलाची नेमकी रचना कशी असते? अशा आशयाची चर्चा लोकल डब्यात, बस, रिक्षामधून ऐकू येऊ लागली.

मुंबई पोलिसांची ही कर्तबगारी वाखाणण्यासारखी!   

मुंबई पोलिसांबाबत अशी चर्चा सुरु होणे खरे तर अत्यंत खेदजनक आहे. या शहरात धुमाकूळ घातलेला एकेकाळचा गॅंगवॉर याच पोलिसांनी संपून टाकला. शहरात काही काही कालावधीने दहशतवादी हल्ले होत होते, २ वेळा साखळी बाँम्ब स्फोटांनी मुंबई हादरून गेली, कसाब आणि त्याच्या साथीदारांनी तर मुंबईला ओलीस ठेवले. त्या सर्वांचा छडा लावून याच मुंबई पोलिसांनी दहशतवाद संपुष्टात आणला. अशा कर्तबगार मुंबई पोलिसांवर खंडणीखोरीचे आरोप होत आहेत, ही चिंताजनक बाब आहे.

गंभीर आरोप पोलीस व्यवस्थेने आत्मपरीक्षण करावे!  

मुंबई पोलिसांचा कारभार हा अत्यंत प्रभावी व्यवस्थेत चालवला जातो. ही व्यवस्था, व्यवस्थेत ठरवून दिलेले चॅनल कुणीही मोडत नाही, म्हणूनच या शिस्तबद्धतेमुळे मुंबई शहर सुरक्षित आहे. मात्र याच पोलीस यंत्रणेवर झालेले गंभीर आरोप पोलीस व्यवस्थेला आत्मपरीक्षण करण्यास भाग पडत आहे. सर्वसामान्यांना मुंबई पोलिसांबद्दल आदर आहे, तो असा काही मोजक्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे निश्चितच कमी होणार नाही. मात्र सध्याच्या चर्चेमुळे जनसामान्यांना मुंबई पोलीस दलाची नक्की कशी रचना आहे, हे जाणून घ्यायचे आहे.

(हेही वाचा : फडणवीसांचे ‘ते’ भाकीत खरे ठरणार का? )

अशी आहे मुंबई पोलीस व्यवस्थेची रचना! 

मुंबईत एकूण ९४ पोलीस ठाणी
गुन्हे शाखेचे १२ युनिट
४ विशेष पथके
आर्थिक गुन्हे शाखेचे १६ युनिट
सायबर गुन्हे सेल

पोलीस आयुक्त ५ सह पोलीस आयुक्त 
सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था)
जबाबदारी –  ९४ पोलीस ठाणी
सह पोलीस आयुक्त (गुन्हे)
जबाबदारी –  गुन्हे शाखेचे युनिट, समाजसेवा शाखा, सायबर गुन्हे शाखा
सह पोलीस आयुक्त (प्रशासन)
जबाबदारी –  संपूर्ण मुंबई पोलीस दलाची प्रशासकीय कामे
सह पोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा)
जबाबदारी –  १६ युनिट
सह पोलीस आयुक्त ( वाहतूक विभाग)
जबाबदारी – प्रत्येकी दोन पोलीस ठाणी मिळून एक वाहतूक विभाग

अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचे ६ अधिकारी  
पाच प्रादेशिक विभागात प्रत्येकी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखेसाठी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त

१३ परिमंडळ 
प्रत्येक परिमंडळाला एक पोलीस उपायुक्त

६ सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी)  
गुन्हे शाखेची १२ पथके – ४ एसपी
५ विशेष पथके – २ एसपी

गुन्हे शाखेची विशेष पथके

१. खंडणी विरोधी पथक
२. गुप्तवार्ता युनिट (सीआययु)
३. मालमत्ता पथक (प्रॉपर्टी सेल)
४. समाज सेवा शाखा
५. प्रतिबंधक विभाग

९४ पोलीस ठाणे 
प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक
३ पोलीस निरीक्षक
५ ते ६ सहाय्यक पोलीस निरीक्षक
१० ते १२ पोलिस उपनिरिक्षक
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
हवालदार

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.