राम लल्लाच्या मूर्तीला रामनवमीच्या दिवशी सूर्य तिलक अभिषेक (Suryatilak Abhishek) होणार आहे. सूर्याच्या किरणांचा भगवान रामलल्लाला अभिषेक करण्यात येणार आहे. यासाठी ऑप्टोमेकॅनिकल प्रणालीच्या (Optomechanical systems) चाचणीचा वापर करण्यात येणार असून ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
रामनवमीला सूर्याची किरणे राम मंदिरात भगवान श्रीरामलल्ला यांचा अभिषेक करतील. मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर बसवण्यात आलेल्या ऑप्टोमेकॅनिकल यंत्रणेद्वारे १७ एप्रिलला दुपारी ठीक १२ वाजता किरणे गाभाऱ्यात पोहोचतील. सूर्यकिरण मूर्तीच्या कपाळाच्या मध्यभागी पडतील याची खात्री करण्यासाठी दररोज चाचण्या घेण्यात येत आहेत. सूर्यकिरण सरळ चार मिनिटे राम लल्लाचा चेहरा प्रकाशित करतील. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (सीबीआरआय), रुरकी आणि अन्य संस्थेतील शास्त्रज्ञांची टीम या कामात गुंतलेली आहे, असे राम मंदिर ट्रस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Ayodhya Ram Temple)
कसा होणार सूर्य तिलक अभिषेक…
सूर्यकिरणे आरशातून परावर्तीत होऊन रामलल्लांच्या कपाळावर ७५ मिमी आकाराच्या गोल तिलकाच्या रुपात ४ मिनिटे दिसतील. देशातील दोन वैज्ञानिक संस्थांच्या मेहनतीने हा सूर्य तिलक साकार होत आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. मंदिराचे पुजारी अशोक उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गाभाऱ्याच्या तिसऱ्या मजल्यावर सूर्यतिलकसाठी वैज्ञानिक उपकरणे बसवण्यात आली आहेत.
(हेही वाचा – Sunday Megablock: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचे रेल्वेचे आवाहन )
दरवर्षी लावला जाणार ‘सूर्य तिलक’
या ऑप्टोमेकॅनिकल पद्धतीने दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दिशेतील बदल लक्षात घेऊन आरसे आणि लेन्समध्ये किरकोळ फेरफार करून मूर्तीची ‘सूर्य तिलक’ लावली जाईल. ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कपाळावर सुमारे २.-२.५ मिनिटे तेजस्वी प्रकाश असेल आणि उर्वरित वेळेत मंद प्रकाश असेल तसेच कार्यक्रमाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करण्यात आली असून अयोध्येतील जवळपास १०० ठिकाणी मोठ्या एलईडी स्क्रीन लावल्या जातील, असेही ते म्हणाले.
शास्त्रज्ञांनी दिली माहिती…
मंदिराच्या तळमजल्यावर दोन आरसे आणि एक लेन्स बसवण्यात आली आहेत. हा आरसा ६० अंशांवर ठेवला आहे, जेणेकरून किरणे थेट कपाळावर पडतील. तिसऱ्या मजल्यावर लावलेल्या आरशातून सूर्यप्रकाश रामलल्लावर पडेल. यातून परावर्तीत होणाऱ्या किरणांनी कपाळावर तिलक तयार होईल. सूर्याची किरणे तिन्ही लेन्स आणि पाइपवर आदळून रामलल्लांवर सूर्यतिलक अभिषेक करतील. मंदिराच्या गर्भगृहात किंवा ज्या गर्भगृहात मूर्ती ठेवली आहे तेथे थेट सूर्यप्रकाश जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने, आरसा आणि लेन्सद्वारे मूर्तीच्या कपाळावर सूर्यकिरण येण्यासाठी ऑप्टोमेकॅनिकल उपकरणे बसवण्यात आली. ही प्रणाली आयआयटी रुरकीने तयार केली. हे सूर्याचा मार्ग बदलण्याच्या तत्त्वांवर आधारित असून यात एक रिफ्लेक्टर, २ आरसे, ३ लेन्स व पितळी पाइप वापरला आहे, अशी माहिती प्रकल्प शास्त्रज्ञ देवदत्त घोष यांनी दिली आहे.
हेही पहा –