भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात ‘मंकीपॉक्स’ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सर्वसाधारणपणे मंकीपॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी २ ते ४ आठवड्यात बरा होतो. असे असले तरी देशात मंकीपॉक्स व्हायरसचा संसर्ग वाढताना दिसतोय. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी या व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याची सूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये असे सांगण्यात आले की, कोणीही जर संक्रमित व्यक्तीच्या सान्निध्यात किंवा संपर्कात दीर्घकाळ राहिल्यास या व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो.
काय आहे मार्गदर्शक सूचना
ओरोग्य मंत्रालयाने संक्रमित व्यक्तीला इतर लोकांपासून लांब ठेवण्याच्या सल्ल्यावर भर दिला आहे. जेणेकरून या व्हायरसचा संसर्ग पसरू नये. तसेच सॅनिटायझरचा वापर, साबण किंवा पाण्याने हात धुणे, मास्कने तोंड झाकणे आणि रूग्णाजवळ डिस्पोजेबल हातमोजे वापरणे, हात आणि आजूबाजूचे वातावरण स्वच्छ करण्यासाठी जंतुनाशकांचा वापर करणे, असे सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा – Alert! तुमच्या मोबाईलमध्ये हे 13 Apps आहेत, तर लगेच Delete करा; अन्यथा…)
ज्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यासह चादर, कपडे आणि टॉवेल शेअर करणे टाळावे. त्याचबरोबर संक्रमित व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यक्रमांना जाणे टाळावे. तसेच व्हायरस बाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असेही मंत्रालयाने सांगितले आहे.
अशा परिस्थितीत देशात मंकीपॉक्सची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे या व्हायरसवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. याकरता केंद्र सरकारने संसर्गाचा सामना करण्यासाठी एक टास्क फोर्स पथकाचे नियोजन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community