वसुबारस
तिथी : आश्विन कृष्ण पक्ष द्वादशी
इतिहास : समुद्रमंथनातून ५ कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.
उद्देश : या अन् पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरीरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात राहायला मिळावे, या कामनेने हे व्रत केले जाते.
सण साजरा करण्याची पद्धत : या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सवत्स गायीची पूजा करतात.
धनत्रयोदशी
तिथी : आश्विन कृष्ण पक्ष त्रयोदशी या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ग दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात.
यमदीपदान : अकाली मृत्यू कुणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (काही जण तेरा दिवे लावतात) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते. फक्त या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील प्रार्थना करावी – ‘धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंड यातून माझी सुटका करावी.’
(हेही वाचा – ‘हलाल-प्रमाणित’ उत्पादनांना दूर ठेवून, आता ‘Halal मुक्त दिवाळी’ साजरी करा !)
नरक चतुर्दशी
तिथी : आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी
इतिहास : आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाते आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी आला. त्यानंतर मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.’
सण साजरा करण्याची पद्धत : आकाशात तारे असताना ब्रह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.
लक्ष्मीपूजन
तिथी : आश्विन अमावस्या
इतिहास : या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.
सण साजरा करण्याची पद्धत : ‘प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध, ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे.
(हेही वाचा – ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दिवाळी अंक आला; Raj Thackeray यांच्या हस्ते प्रकाशन)
बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)
तिथी : कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा
महत्त्व : हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात.
सण साजरा करण्याची पद्धत
अ. बलीप्रतिपदेच्या दिवशी भूमीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात.
आ. ‘बलीराज्यात शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे’, असे धर्मशास्त्र सांगते. अभक्ष्य भक्षण, अपेयपान आणि अगम्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत; म्हणून या दिवसांत माणसे दारू उडवतात (आतषबाजी करतात); पण दारू पीत नाहीत! शास्त्राने अनुमती दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात.
(हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील भुलेश्वरमध्ये मोठं घबाड सापडलं; १३२ कोटींची रोकड जप्त!)
भाऊबीज (यमद्वितीया)
तिथी : कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया
इतिहास : या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ म्हणतात.
महत्त्व : अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता ‘यमधर्म’ हिचे पूजन करतात.
‘या दिवशी यमराज त्याची बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो आणि त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.
इ. यमतर्पण, यमदीपदान आणि यमाची प्रार्थना करणे : अपमृत्यू निवारणार्थ ‘श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।’ असा संकल्प करून यमाच्या चौदा नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. याच दिवशी यमाला दीपदान करायचे असते.
(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community