पॅन कार्डमधील आडनाव बदलायचंय? फक्त ‘या’ 3 ऑनलाईन स्टेप्स करा फॉलो

169

पॅनकार्ड हे सध्याच्या काळात सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. पॅन कार्डचा वापर बँकेत ५० हजार रूपयांपेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी किंवा आयटीआप फाईल करण्यासाठी केला जातो. पण काही वेळा पॅनमधील अडनाव बदलण्याची गरज भासते. लग्नानंतर अनेकदा आडनाव बदलल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेच पॅन कार्डमधील आडनाव बदलण्याची गरज भासते. पॅनकार्डवरील हे सोपे बदल करण्यासाठीही नागरिक बऱ्याचदा गोंधळतात. मात्र हे अडनाव बदलणे अगदी सोपे आहे. या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या पॅनकार्डवरील आडनाव बदलू शकतात.

(हेही वाचा – आता WhatsApp वरून खरेदी करा Metro तिकीट, काय आहे नवी सेवा?)

  1. पॅनकार्डवर तुमचे आडनाव बदलण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://onlineservices.nsdl.com/paam/ या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरावा लागेल. समोर दिसणाऱ्या फॉर्ममध्ये तुम्हाला आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.
  2. या स्टेपच्या दुसऱ्या टप्प्यात हा फॉर्म ऑनलाईन सबमिट करावा लागेल. आता तुम्हाला तुमच्या नावापुढे असणारा ऑप्शन निवडावा लागेल आणि या फॉर्ममध्ये तुमचा पॅन नमूद करावा लागेल.
  3. पुढे येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी करावी लागेल. पडताळणी झाल्यानंतर व्हॅलिडेटवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करावे लागणार आहे.

तुमच्या पॅनकार्डवरील अडनाव बदलण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म सबमिट करावा लागेल. मात्र यासाठी तुम्हाला पैसे देखील द्यावे लागणार आहे. तुम्ही हे पैसे नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि कॅश कार्डद्वारे करू शकतात.

हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पॅन अर्ज डाऊनलोड करून तो भरावा लागेल. त्यानंतर त्याची प्रिंट काढून पासपोर्ट फोटो चिकटवून फॉर्मवर स्वाक्षरी केली असल्याची खात्री करा. फॉर्मसह, तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची स्व-प्रमाणित करणे देखील आवश्यक आहे. याशिवाय, जर तुम्ही NSDL साठी अर्ज केला असेल, तर हा अर्ज देखील NSDL कडे पाठवावा लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.