हॉटेल्सच्या रुममध्ये स्पाय कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग केल्याची अनेक प्रकरणे अनेकदा समोर आली आहेत. नुकतेच नोएडामध्ये सुद्दा हॉटेलच्या खोलीत छुप्या कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग केल्याची घटना समोर आली आहे. ग्राहकांकडून पैसे उकळण्यासाठी असे गैरप्रकार केले जात आहेत. तुम्हीही प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये राहत असाल तर काही गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत.
( हेही वाचा : Sunday Megablock : रविवारी बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या मेगाब्लॉक अपडेट! )
हॉटेलमध्ये रुम घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
मिरर टेस्ट
रुममध्ये गेल्यावर सर्वप्रथम टू-वे मिरर टेस्ट ही चाचणी घ्या. यासाठी तुम्हाला फक्त तुमचे बोट आरशावर ठेवावे लागेल. तुमचे बोट आणि इमेजमध्ये अंतर असेल तर समजा हा सामान्य आरसा आहे. जर तुमचे बोट आणि प्रतिमा एकत्र चिकटलेली असेल तर तो टू-वे मिरर आहे. ही चाचणी कशी करायची हे सांगणारे अनेक व्हिडिओ सोशलमिडियावर अपलोड करण्यात आलेले आहेत. त्यामुळे असे व्हिडिओ पाहून तुम्ही खात्री करून घेऊ शकता.
साहित्य तपासून घ्या
कॅमेरे सहसा खोलीत सजावट केलेल्या वस्तूंमध्ये लपवलेले असतात. कॅमेरा स्पीकर, अलार्म घड्याळ तसेच कोणत्याही सजावटीच्या वस्तूंमध्ये कॅमेरा लपवला जाऊ शकतो. त्यामुळे खोलीतील वस्तूंचे काळजीपूर्वक परीक्षण करा. टी.व्ही, सेट-टॉप बॉक्स सुद्धा तपासून घ्या.
टीव्हीमध्येही असू शकतो कॅमेरा
टीव्ही आणि सेट-टॉप बॉक्सवर निळे किंवा जांभळे लाइट्स दिसल्यास अधिक काळजी घ्यावी, स्मार्टफोनचा फ्लॅशलाईटचा वापर करून तुम्ही याची पडताळणी करू शकता. अनेकदा शॉवरमध्येही कॅमेरा लपवलेला असतो. रुममधील सर्व दिवे बंद केल्यावर तुम्हाला कॅमेराचे मंद लाईट लगेच दिसेल. त्यामुळे प्रवासादरम्यान रुम बुक करताना काळजी घेणं आवश्यक आहे.
याशिवाय तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट या अॅप्सवर तुम्हाला कॅमेरा डिटेक्टर डिव्हाईस मिळतील. या उपकरणांची किंमत जास्त आहे परंतु यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकता.
Join Our WhatsApp Community