15 ऑगस्टपासून कसा मिळणार लोकल ट्रेनचा पास? जाणून घ्या संपूर्ण माहिती

241

लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात येणार असून, लवकरच ती सुरू करण्यात येणार आहे. पण ही यंत्रणा नक्की काम कशी करणार, याबाबत सर्वसामांन्यांच्या मनात गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया.

लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन प्रवासासाठी विशिष्ट पास देण्यात येणार आहेत. या पासवर क्यू- आर कोड असणार आहे. हा पास ‘युनिव्हर्सल पास’ म्हणून ओळखला जाईल. हा पास लोकल ट्रेनसोबतच मेट्रो, मोनोरेल त्याचप्रमाणे मॉल किंवा इतर ठिकाणी सुद्धा चालू शकणार आहे.

(हेही वाचाः 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरू, पण…)

कसा मिळवता येणार पास

  • राज्य सरकारकडून एक वेबसाईट तयार करण्यात येणार आहे. ही वेबसाईट को-विनशी लिंक केली जाणार आहे. यामुळे व्यक्तीचे लसीकरण पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासता येणार आहे.
  • ज्या व्यक्तीला पास काढायचा आहे, त्याने या वेबसाईटवर आपला मोबाईल क्रमांक एंटर करुन, मोबाईलवर आलेला ओटीपी वेबसाईटवर समाविष्ट करायचा आहे.
  • त्यानंतर व्यक्तीला आपले लसीकरण प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड करायचे आहे.
  • तसेच आपला एक फोटो वेबसाईटवर अपलोड करायचा आहे.
  • वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्यू-आर कोड पास(युनिव्हर्सल पास) जनरेट होईल.
  • हा पास रेल्वेच्या तिकीट खिडकीवर दाखवून, तिकीट किंवा पास मिळवता येणार आहे.
  • ज्या नागरिकांकडे इंटरनेटची सेवा उपलब्ध नाही किंवा ज्यांना वेबसाइट हाताळता येत नाही, अशा नागरिकांसाठी मुंबई महापालिकेत हेल्प डेस्क सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याठिकाणी नागरिक आपली कागदपत्रे दाखवून युनिव्हर्सल पास मिळवू शकतात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.