ऑनलाईन शॉपिंग करताय? मग या साईट्सपासून सावध रहा

164

फसवणुकीचे अनेक प्रकार आपण ऐकत असतो. दिवसागणिक या प्रकरांत वाढ होत चालली आहे. सध्या ऑनलाईन म्हणजेच डिजिटल व्यवहारांना अधिक प्राधान्य दिलं जात आहे, याचाच फायदा हॅकर्स घेताना दिसतात. आपण अशाप्रकारच्या अनेक गोष्टी  ऐकल्या वा पहिल्या असतील. ऑनलाईन व्यवहार करताना झालेली फसवणूक, बँकेच्या नावाने खोटे फोन करुन झालेली फसवणूक, प्रलोभने दाखवणा-या एखाद्या लिंकवर क्लिक केल्याने झालेली फसवणूक अशा अनेक प्रकारच्या फसवणुकी आपण ऐकल्या आहेत किंवा आपणच त्याचे बळी पडलेले असू.

बनावट शॉपिंग साईट

सध्या अशाच एका फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरतच्या एका उच्चशिक्षित मुलाने तब्बल 22 हजार महिलांची बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून फसवणूक केली आहे. या संकेस्थळाला ‘शॉपी डॉट कॉम’ नाव देऊन त्यात महिलांना आकर्षित करण्यासाठी महिलांचे कपडे, चप्पला, तसेच गृहोपयोगी वस्तू, इमिटेशन ज्वेलरी आदींची छायाचित्रे आणि ८० टक्क्यापर्यंत सूट अशी प्रलोभने देऊन या शॉपी डॉट कॉमची लिंक समाज मध्यमांवर प्रसारित करण्यात आली.

(हेही वाचाः रोड ट्रीपला जायचंय… टोलचा खर्च किती होईल? गुगल मॅप देईल उत्तर)

वस्तू पाहिली, फसवणूक झाली  

या लिंकवर क्लिक केल्यावर आकर्षक वस्तूंची कमी किंमत बघून अनेकांनी या वस्तू मागवण्यासाठी ऑर्डर केली  असता, त्यावर कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय नव्हता. त्यामुळे ग्राहकांना जर वस्तू खरेदी करायची असेल तर केवळ ऑनलाईन व्यवहार करुनच ती खरेदी करता येणार होती. पण लोकांनीही वस्तूंच्या आकर्षकतेला भूलून याकडे दुर्लक्ष केले आणि ऑनलाईन पैसे देऊन वस्तू ऑर्डर केल्या आणि इथेच त्यांची खरी फसवणूक झाली. कारण साधारणपणे ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तू आठवड्याभरात येण्याची शाश्वती असते. पण या साईटवरुन ऑर्डर केलेल्या वस्तू या ग्राहकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत.

असा लागला छडा

मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलेने या साईटवरुन एक वस्तू तीन हजार रुपयांना ऑर्डर केली होती. पण ती वस्तू अनेक दिवस होऊनही तिच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे या महिलेने याबाबत पोलिसांत तक्रार केली. या गोष्टीचा तपास करताना अशा अजून 22 हजार महिलांची फसवणूक झाल्याचं उघड झालं. सोबतच या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिस पथकाला अजून 11 बनावट वेबसाईटचा छडा लागला आहे.

(हेही वाचाः आळशी पोलिस एफआयआर ऐवजी तक्रारदाराला देतात प्रमाणपत्र)

या आहेत काही बनावट साईट्स

  • व्हाईट स्टोन्स डॉट इन
  • जॉलीफॅशन डॉट कॉम
  • टेकसारी डॉट कॉम
  • अशुअर्डकार्ट डॉट इन
  • रिपब्लिक सेल्स ऑफर्स डॉट मायशोपीफाय डॉट कॉम
  • थर्मोक्लासिक आणि कस्मिरा डॉट इन
  • या बनावट संकेतस्थळांवरही अशाच फसवणूकीच्या तक्रारी होत्या.

कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय उपयुक्त

जर तुम्ही सुद्धा ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देत असाल. तर आधी अशा वेबसाईट्सची योग्य ती शहानिशा करुन घ्या. शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी(वस्तू द्या, पैसे घ्या)चा पर्याय निवडा त्यात फसवणूक होण्याचे प्रमाण कमी आहे.

(हेही वाचाः ‘ऑनलाईन’ व्यवहार करताना ‘फसवणूक’ कशी टाळाल? वाचा सविस्तर माहिती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.