Amrish Puri यांचा जीवन प्रवास कसा होता ? वाचा सविस्तर..

195
Amrish Puri यांचा जीवन प्रवास कसा होता ? वाचा सविस्तर..
Amrish Puri यांचा जीवन प्रवास कसा होता ? वाचा सविस्तर..

अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा जन्म २२ जून १९३२ साली पंजाब इथल्या नवागाव या शहरात झाला. अमरीश पुरी (Amrish Puri) हे एक भारतीय चरित्र अभिनेते होते. ते अभिनेते मदन पुरी यांचे धाकटे भाऊ होते. ते हिंदी चित्रपटसृष्टीतले एक प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांनी निशांत, मंथन आणि भूमिका यांसारख्या चित्रपटातून अभिनेता म्हणून लोकांच्या मनावर आपला ठसा उमटवला. (Amrish Puri)

(हेही वाचा- Thane: ठाण्यातील फुटबॉल मैदानावर लोखंडी शेड कोसळली, ८ मुले जखमी; ३ गंभीर अवस्थेत)

अमरीश पुरी (Amrish Puri) यांना नंतर चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून प्रसिद्धी मिळाली. त्यांनी १९८४ साली आलेल्या स्टीव्हन स्पीलबर्गच्या “इंडियाना जोन्स अँड द टेंपल ऑफ डूम” नावाच्या चित्रपटात मोलारामची भूमिका साकारली होती. त्यांनी निभावलेली ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. या भूमिकेचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की, त्यांनी कायम मुंडन ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना खलनायकाच्याही अनेक भूमिका मिळाल्या. (Amrish Puri)

व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम करूनही त्यांनी वेगळ्या भूमिकाही साकारल्या. अमरीश पुरी हे कलात्मक चित्रपटांशी कायमच जोडलेले होते. त्यानंतर अमरीश पुरी (Amrish Puri) यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या कारकिर्दीचा काळ गाजवला. खलनायकी भूमिका करण्यापासून ते सहाय्यक चरित्र अभिनेता म्हणून त्यांनी सगळ्या प्रकारच्या भूमिकांना चांगला न्याय दिला. त्यांनी आपल्या अभिनयाची जादू कधीच कमी होऊ दिली नाही. (Amrish Puri)

(हेही वाचा- Tom Alter : राजेश खन्नामुळे ‘हा’ झाला अभिनेता; जीवन प्रवास जाणून घ्या)

अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी पंजाब येथे झाला. त्यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतल्या करिअरची सुरुवात १९७१ साली आलेल्या ‘प्रेम पुजारी’ नावाच्या चित्रपटातून केली. त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करायला थोडा वेळ लागला खरा, पण उशिरा का होईना त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप कायमची उमटवली. (Amrish Puri)

१९८० सालच्या दशकात त्यांनी कित्येक मोठ्या चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून आपली छाप सोडली. १९८७ साली शेखर कपूरच्या ‘मिस्टर इंडिया’ नावाच्या चित्रपटातल्या मोगॅम्बोच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं घर तयार केलं. १९९० सालच्या दशकात त्यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘घायल’ आणि ‘विरासत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. (Amrish Puri)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Ban : बाद फेरीच्या दृष्टीने भारतासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा )

अमरीश पुरी (Amrish Puri) यांनी हिंदी भाषेव्यतिरिक्त कन्नड, पंजाबी, मल्याळम, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतही काम केलं आहे. तसेच त्यांनी हॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केलं. अमरीश पुरी यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Amrish Puri)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.