WhatsApp च्या नव्या ‘पोल’ फीचर बद्दल माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर

97

मेटाची मेसेजिंग सेवा, व्हॉट्सअॅपने व्हॉट्सअॅप पोल्स नावाचे नवीन फीचर लाँच केले आहे. अँड्रॉइड अपडेटसह व्हॉट्सॲपमध्ये पोल फीचर ग्रुप चॅटमध्ये तयार केले गेले आहे. पोल तयार करणे ग्रुपमध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते. म्हणजेच ही सुविधा फक्त ग्रुप अॅडमिन्सपुरती मर्यादित नाही.

(हेही वाचा – पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पहिली 5G+ सेवा ‘या’ ठिकाणाहून सुरू)

व्हॉट्सअॅप चॅटमध्ये पोल तयार झाल्यानंतर त्यासाठी १२ पर्याय उपलब्ध होतील. युजर्सच्या गरजेनुसार पर्याय तयार केले जाऊ शकतात. एकदा पोल ग्रुप सदस्यांसोबत शेअर केल्यावर ते त्यांच्या आवडीचा पर्याय निवडू शकतात. व्हॉट्सअॅपने अलीकडेच आपल्या Android आणि iOS युजर्ससाठी नवीन पोल फीचर लॉंच केले आहे. मेटा-मालकीचे इन्स्टंट-मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आता युजर्सना ग्रुप्स मध्ये तसेच वैयक्तिक चॅटमध्ये पोल तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र व्हॉट्सअॅप पोल फीचर फक्त मोबाइल व्हर्जनसाठी उपलब्ध आहे.

WhatsApp पोल कसे तयार कराल

  • तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर वैयक्तिक चॅट उघडा.
  • आता वैयक्तिक चॅट किंवा ग्रृप उघडा ज्यामध्ये तुम्हाला पोल तयार करायचा आहे.
  • पुढे मेसेज बॉक्सच्या बाजूला असलेल्या संलग्न बटणावर टॅप करून पोल चिन्हावर टॅप करा

1 व

  • आता तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो ASK Question या पर्यायाद्वारे विचारा
  • आता Add बटणावर टॅप करून पोल पर्याय निवडा.
  • तुम्ही प्रश्न आणि पर्याय जोडल्यानंतर, सेंड पर्यायावर टॅप करा. तुमचे पोल तयार होईल.

2 व

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.