विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! 10वी,12वी ची परीक्षा ऑफलाईनच होणार

178

देशभरात कोरोनाच्या रुग्णांचा विस्फोट होत आहे, तिस-या लाटेच्या उंबरठ्यावर देश उभा असताना, आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेणे शक्य नसल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची ऑफलाईन परीक्षांची तयारी सुरु आहे.

ऑफलाईन परीक्षांची तयारी सुरु

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून ऑफलाईन परीक्षांची तयारी सुरु करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शासनाकडून बोर्डाला परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन हे अद्याप कळवण्यात न आल्याने  बोर्ड ऑफलाईन परीक्षांची तयारी करत आहे.

( हेही वाचा: गतवर्षापेक्षा 2021 मध्ये ‘या’ कारणानं रेल्वे अपघातांत सर्वाधिक मृत्यू! )

अद्याप कोणताही निर्णय नाही 

17 नंबरचा फाॅर्म भरण्यासाठी 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आली आहे. 12 जानेवारीपर्यंत अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अद्याप तरी परीक्षा ऑनलाईन घेण्याचा कोणताही निर्णय न झाल्याचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याचं सांगितलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.