अभ्यासाच्या तणावामुळे बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या! पनवेलमधील धक्कादायक घटना

बारावीच्या परीक्षांना सुरूवात झाली असून एका विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेलमधील वंश म्हात्रे असे मुलाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

( हेही वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ला दादासाहेब फाळके पुरस्कार; मंत्री मुनगंटीवार यांच्याकडून अभिनंदन )

अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या

वंश म्हात्रे हा गेल्या काही दिवसांपासून अभ्यासाच्या तणावाखाली होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. सोमवारी २० फेब्रुवारीला त्याचे आई-वडील घरात नव्हते त्याचवेळी वंश म्हात्रेने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. आई-वडील घरी आल्यावर त्यांना दरवाजा बंद आढळला आणि मुलाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला हे पाहून त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला.

पनवेल पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांना याप्रकरणी पुढील चौकशी केली. दरम्यान, अभ्यास आणि इतर तणावांमुळे आत्महत्येसारखे पाऊल न उचलण्याचे आवाहन मुलांना करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here