तुर्कीतील कोळसा खाणीत मोठा स्फोट; 22 ठार

186

उत्तर तुर्कीतील कोळसा खाणीत स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, उत्तर तुर्कीमधील कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथक खाणीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. स्फोटाची भीषणता फारच गंभीर असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

( हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्यावर गुन्हा दाखल! )

कुठे आणि कसा झाला स्फोट ?

बार्टिनच्या काळ्या समुद्र किनारी प्रांतातील अमासरा शहरातील सरकारी टीटीके अमासरा मुसेसे मुडुर्लुगु खाणीत शुक्रवारी हा भीषण स्फोट झाला. तुर्कीचे ऊर्जामंत्री फातिह डोनमेझ यांनी सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार, हा स्फोट फायरएम्पमुळे झाला असावा. या स्फोटात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

खाणीत 110 लोक उपस्थित

शुक्रवारी हा स्फोट झाला असून अद्याप बचाव कार्य सुरु आहे. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी खाणीत तब्बल 110 लोक उपस्थित होते. तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या वेळी खाणीत 110 लोक उपस्थित होते. स्फोटानंतर अनेक कामगार पळून जाण्यात यशस्वी ठरले तर अनेकजणांना खाणीबाहेर पडता न आल्याने खाणीतच अडकून पडले. त्यामुळे काही कामगारांना आपला जीव गमवावा लागला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.