२०२२ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट सामन्यात भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीने जबरदस्त खेळी केली. झुलनच्या शानदार इन-स्विंगर म्हणजेच ड्रीम बॉलने इंग्लिश संघाची गळती होऊ लागली आणि अर्धा संघ १२८ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय महिला संघाने हा सामना ७ विकेटने जिंकला. (Cricketer Jhulan Goswami)
झुलन गोस्वामी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांना फुटबॉल हा खेळ खूप आवडायचा. मात्र १९९२ चा क्रिकेट विश्वचषक टिव्हीवर पाहिल्यावर त्यांना क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाली. झुलन गोस्वामी ह्या जबरदस्त बॉलर आहेत. त्यांना महिला संघाची सचिन तेंडुलकरही म्हटलं जातं.
वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये त्यांनी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंड विरुद्ध खेळला. झुलन गोस्वामीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वाधिक विकेट (१९६) घेतले आहेत.
(हेही वाचा : Ranichi Baug : कोको,स्टेला आणि जेरी, मुंबईतील पेंग्विनच्या तीन पिल्लांचे झाले बारसं)
त्यांनी २००७ मध्ये आयसीसी पुरस्कार जिंकला आहे. सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेट खेळाडूसाठी एमए चिदंबरम ट्रॉफी देखील त्यांनी जिंकली होती. मिताली राजच्या आधी झुलन ह्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार होत्या. (Cricketer Jhulan Goswami)
टीम भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील त्यांची स्तुती केली आहे. रोहित शर्माने एका कार्यक्रमात सांगितले की, “ती मला गोलंदाजी करत होती तेव्हा तिच्या इन-स्विंग चेंडूने मी थक्क झालो. यानंतर आमच्यात खूप चर्चा झाली आणि तिचा खेळ पाहायला मला खूप आवडतो.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community