चंद्रपूरात शनिवारी आणि रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने आणि बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. शनिवारी विरुर विभागात वाघाचा तर रविवारी राजुरा तालुक्यात बिबट्याचा हल्ला झाला. दोन्ही घटनांमुळे वनविभागाविरोधात जनप्रक्षोभ वाढल्याचे चित्र होते. चंद्रपूरात दरवर्षाला वाघाच्या हल्ल्यात अंदाजे ४४ माणसांचा बळी जात आहे. त्यामुळे वाढत्या संघर्षमय घटना पाहता ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
(हेही वाचा – नोकरी गेली तरी नो टेन्शन! तुमच्याकडे ‘हा’ विमा आहे ना?)
शनिवारी दुपारी शेतात गेलेल्या एका इसमावर वाघाचा हल्ला झाला. माणसाची शोधाशोध सुरु झाल्यानंतर सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला. मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. विरुर हा विभाग तेलंगणा राज्याच्यालगत असतो. या भागांतून वाघांची एका राज्यातून दुस-या राज्यात ये-जा सुरु असते. हल्लेखोर वाघ हा तेलंगणा राज्यातून आला असावा, असा अंदाज चंद्रपूर वनविभाग (प्रादेशिक)चे मुख्य वनसंरक्षक किशोर माणकर यांनी व्यक्त केला.
रविवारच्या घटनेत राजुरा तालुक्यातील जंगू कुलसंगे (५५) या इसमाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर संतापलेल्या स्थानिकांना आटोक्यात आणण्याासाठी रविवारी रात्रीपर्यंत वनाधिका-यांचे प्रयत्न सुरु होते.
Join Our WhatsApp Community