धक्कादायक! तिरुपती बालाजी मंदिरातील मानवी केसांची चीनकडून तस्करी!

चीन कशाचा धंदा करील आणि त्यासाठी काय करील याचा थांग लागायचा नाही. जगभरात केसांचे विग अर्थात टोप बनवण्याच्या उद्योगातील ७० टक्के उद्योग एकट्या चीनमध्ये आहे आणि हा उद्योग चीन तिरुपती बालाजी देवस्थानात जमा होणाऱ्या मानवी केसांच्या जोरावर चालवत आहे. 

98

चीनसोबतचे आर्थिक व्यवहार थांबले, चीनमधून भारतातील गुंतवणूक थांबवली, चिनी मालांची आयात थांबवली, असे जरी सरकार सांगत असले, तरी तस्करीच्या मार्गाने चीनशी भारतातील छोट्या मोठ्या उद्योगांचे कसे अजून व्यावसायिक संबंध टिकून आहेत, याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यासाठी निमित्त ठरले आहे ते आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर! तिरुपती बालाजी मंदिरात श्री बालाजी यांचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने हिंदू भाविक येत असतात, तिथे पुरुष भक्त श्रद्धेने केस अर्पण करून टक्कल करतात. त्या केसांची चक्क चीनकडून तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कुठून होते केसांची तस्करी? 

  • तिरुपती बालाजी हे तीर्थक्षेत्र भरतातातील सर्वाधिक प्रसिद्ध मंदिर आहे.
  • इथे दररोज देश – विदेशातून किमान ५० हजार ता कमाल १ लाख हिंदू भक्त दर्शनासाठी येत असतात.
  • याठिकाणी दर्शन घेतल्यावर केस अर्पण करण्याची प्रथा आहे. नवस पूर्ण झाल्यामुळे पुरुष केस अर्पण करतात.
  • अशा प्रकारे या मंदिरात दररोज हजारो किलो केस गोळा होतात.
  • या केसांची म्यानमार मार्गे थेट चीन येथे तस्करी केली जाते.
  • मिझोराम येथून म्यानमार मार्गे हे केस चीनकडे पाठवले जातात.
  • आसाम रायफल्सने ही तस्करी उघडकीस आणली.
  • मिझोरामची ८० टक्के सीमा ही बांगलादेश आणि म्यानमारला लागते. त्यातील ५३० किमी सीमा म्यानमारला लागते.
  • म्यानमारकडील सीमा खुली असल्याने इथून कायम तस्करी सुरू असते.

(हेही वाचा : प्रयागराज येथील मशिदींवरील भोंगे सकाळपर्यंत बंद राहणार! पोलीस महानिरीक्षकांचा आदेश )

तस्करी कशी उघडकीस आली? 

  • तिरुपती येथून केसांनी भरलेले दोन ट्रक म्यानमार सीमेपासून ७ किमी अंतरावर पकडले.
  • ५० किलो केस हे १२० पिशव्यांमध्ये भरून त्यांची तस्करी करण्यात येत होती. त्यांची किंमत अंदाजे १ कोटी ८० लाख इतकी होती.
  • या सीमेवरून अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी होते, पण केसांची तस्करी होताना प्रथमच पकडण्यात आली.
  • तिरुपती बालाजी देवस्थानने २०१९ मध्ये १४३ टन केसांची लिलाव केला, त्यातून देवस्थानाला ११.१७ कोटी रुपये महसूल मिळाला.
  • २०१९ लाच केसांच्या तस्करीसंबंधी तक्रारी आल्या, त्यानंतर वाणिज्य मंत्रालयाने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क बोर्ड आणि तस्करी विरोधी पथकाला पत्र लिहिले होते.
  • त्यानुसार म्यानमार बॉर्डर येथे विशेष पथक तैनात करण्यात आले होते.

कशाकरता होते तस्करी? 

  • तस्करी केलेल्या केसांची चीनमध्ये केसांचे टोप बनवले जातात, यातून चीन मोठी कमाई करते.
  • केवळ भारतातूनच नव्हे तर अन्य देशांतूनही चीनकडे केसांची तस्करी होते.
  • जागतिक पातळीवरील विग, टोप बनवण्याच्या उद्योगापैकी ७० टक्के उद्योग चीनकडे आहे. यासाठी अधिकतर केस भारतातून येतात.
  • चीन त्यानंतर केसांचे टॉप बनवून जगभरात निर्यात करतो.
  • आशियायी देश आणि युरोपमध्ये यांना बरीच मागणी आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.