चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

चंद्रपूरात गुरूवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एकाचा सकाळी मृत्यू झाला. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. तेंदूपत्ता उचलताना या इसमावर वाघाने हल्ला केला.

( हेही वाचा : उन्हाळी सुट्टीसाठी ‘या’ मार्गावर धावणार विशेष गाड्या! )

चंद्रपूरातील नागभिड तालुक्यातील हुंडेश्वरी गावात ही घटना घडली. अडतुजी मारुती मेश्राम (६०) असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. अडतुजी हे सकाळी सहाच्या सुमारास तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेले होते. हा भाग वनविभागाच्या ब्रह्मपुरी भागांत मोडतो. या भागांत ८५ ते ९० वाघ राहतात. या दिवसांत तेंदुपत्ता काढण्यासाठी माणसे जंगलात जातात. वाघांचे वाढते हल्ले लक्षात घेता तेंदुपत्ता काढण्याच्या कामाविषयी सावधनता बाळगावी, असे आवाहन चंद्रपूर वनविभागाकडून करण्यात आले आहे.

सध्या उष्णतेच्या तडाख्यामुळे तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात मजूर भल्या पहाटे जात आहेत. याच काळात वाघांचा वावर असतो. तेंदूपत्ता काढताना जमिनीवर खाली बसून काम करावे लागते. तृणभक्षक प्राणी समजून कित्येकदा वाघ माणसांवर हल्ला करतात. त्यामुळे वनविभाग तेंदूपत्ता काढण्यासाठी जंगलात समूहाने जाणे आवश्यक ठरते. भल्या पहाटे वाघाच्या वावराच्या वेळीस तेंदूपत्ता काढण्याचे काम टाळावे.
– बंडू धोतरे, सदस्य, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ.

काय काळजी घ्याल 

  • तेंदूपत्ता काढण्यासाठी जंगलात समूहाने जा.
  • तेंदूपत्ता काढण्यासाठी सूर्योदयानंतर जंगलात जाणे योग्य राहील.
  • तेंदूपत्ता काढताना काही मजूरांनी उभे राहून इतर मजूरांची निगराणी करावी.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here