चंद्रपूरात नागभीड येथील तळोदी रेंजमध्ये सोमवारी दुपारी वाघाच्या हल्ल्यात गुराखाच्या मृत्यू झाला आहे. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. या भागांत टी-१५ आणि टी१०३ या अंदाजे दोन किंवा तीन वर्षांच्या वाघांचा वावर आहे. या दोघांपैकी एका वाघाने गुराख्यावर हल्ला केल्याचा अंदाज वनाधिका-यांनी व्यक्त केला. याआधी दोन्ही वाघांकडून कधीही माणसावर हल्ला झालेला नाही. यापूर्वी सप्टेंबर महिन्यांत या भागांत वाघाचा हल्ला झाला होता.
( हेही वाचा : अमूल आणि मदर डेअरी पाठोपाठ आता ‘या’ कंपनीचेही दूध महागले; ‘असे’ असतील नवे दर )
तळोदीतील कम्पाउण्ड क्रमांक ६६९ येथील मिरांडा राउण्ड येथील शिवारात वाघाने गुराख्यावर हल्ला केला. सत्यवान पंढरी मेश्राम (६५) असे मृत गुराख्याचे नाव आहे. शेळ्या चरत असताना वाघाने अचानक पंढरी मेश्राम यांच्यावर हल्ला केला. मेंढ्या मात्र चराईनंतर घरी परतल्या तरीही मेश्राम परतले नव्हते. अखेरीस सायंकाळी मेश्राम यांच्या कुटुंबीयांनी आणि गावक-यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी शिवारात सत्यवान मेश्राम यांचा मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच वनाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत सदर घटनेची माहिती घेतली. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने २५ हजार रुपयांची रक्कम वनविभागाने दिल्याची माहिती चंद्रपूर वनविभागाचे (प्रादेशिक)चे मुख्य वनसंरक्षक किशोर लोणकर यांनी दिली.
Join Our WhatsApp Community