गोंदियात हत्तींच्या कळपाचा पाठलाग करताना एकाचा मृत्यू

184

गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून वावर सुरू आहे. या हत्तीच्या कळपाचा पाठलाग करणा-या एका व्यक्तीवर हत्तीने हल्ला केला. या हल्ल्यात तिडका गावात राहणा-या सुरेंदा कळहीबाग यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली.

( हेही वाचा : मुंबईकरांसाठी महत्त्वाची अपडेट! ५ ऑक्टोबरला वाहतुकीत होणार ‘हे’ बदल; अनेक मार्गावर ‘प्रवेशबंदी’, तर काही भागात ‘नो पार्किंग झोन’)

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस गडचिरोली जिल्ह्यातून २३ हत्तींचा कळप गोंदियात दाखल झाला होता. हत्तींच्या कळपावर वनविभागाने थर्मल ड्रोनच्या आधारे नजर ठेवली होती. दिवसाच्या प्रत्येक प्रहाराला वनविभागाचे टेहाळणी पथक हत्तींच्या हालचालींवर देखरेख करत होते. गेल्या पाच दिवसांपासून जंगलात राहणा-या हत्तींच्या कळपाचे छायाचित्र काढण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी हत्तींचा पाठलाग करत होते.

कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई दिली जाईल

दोन दिवसांपूर्वी जंगलात प्रवेश करणा-या सुमारे ७० गावक-यांना वनविभागाच्या टेहाळणी पथकाने बाहेर काढले होते. हत्ती गावाच्या हद्दीतील पिके खात होती. प्रत्यक्षात हत्तींनी गावात कधीच प्रवेश केला नाही. वनविभाग पिकांच्या नुकसानीबाबत वेळेवर पंचनामे करत आहेत, अशी माहिती टेहाळणी पथकाने दिली. मंगळवारी सकाळी तिडका गावाजवळून हत्तींचा कळप जात असताना गावक-यांनी ढोल वाजवत हत्तींचा साडेतीन किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. अखेर वैतागलेल्या हत्तींचा कळप गावक-यांवर हल्ला केला. कळपातील एका हत्तीने सुरेंद्र कळहीबाग हत्तींने उचलून जमिनीवर आदळले. सुरेंद्र यांच्यावर हल्ला होताच इतर गावक-यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

हल्ल्यानंतर घटनास्थळी वनाधिका-यांनी धाव घेतली. मात्र हत्तीचा कळप जंगलात गेला होता. हत्तींच्या हालचालींवरुन त्यांनाही विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागल्याने हत्तींना तणाव आल्याचे टेहाळणी पथकाने सांगितले. कळहीबाग यांच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन वनाधिका-यांनी दिले. सायंकाळी ६ नंतर वनाधिकाऱ्यांच्या पाहणीत हत्तींचा कळप नियोजित ठिकाणाहून आता माघारी फिरत असल्याचे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.